मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबाला शासनातर्फे मदत जाहीर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020
  • गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात गाजत आहे.
  • महाराष्ट्रात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये विशेष आरक्षण दिले जावे अशी मागणी जोर धरून, मागील चार वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा तरुणांनी पुढे येऊन अनेक मोर्चे, आंदोलनं केली.

मुंबई :- गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात गाजत आहे. महाराष्ट्रात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये विशेष आरक्षण दिले जावे अशी मागणी जोर धरून, मागील चार वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा तरुणांनी पुढे येऊन अनेक मोर्चे,आंदोलनं केली. या मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्च्यात आणि आंदोलनात ४२ तरुणांनी आपले बलिदान दिले. आंदोलनात बलिदान दिलेले हे तरुण आपल्या कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यातरुणांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत दिली जावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर बुधवारी पारपडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या ४२ व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील माहिती माध्यमांना दिली आहे. 

मराठा समाजातील तरुणांना आरक्षण दिले जावे याकरीता महाराष्ट्रात एकूण ५८ मोर्चे काढण्यात आले होते. तसेच या मोर्च्या दरम्यान मृत्यमुखी पडलेल्या ४२ व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनातर्फे मदत मिळावी ही मागणी देखील अनेक वर्षांपासून होत होती. फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या या मागणीला हिरवा कंदील दाखवत बलिदान दिलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत देऊ केली होती. परंतु सरकारी कामामुळे काही कुटुंबांपर्यंत ही मदत पोहचू शकली नाही. त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला मराठा संघटनांनी पुन्हा एकदा याची आठवण करून दिली तसेच बलिदान दिलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्याचीही मागणी लावून धरली. अखेर बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली.  

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आपल्या ट्ववीटर अकाऊंट वरून सरकारने घेतलेल्या यानिर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सर्व मंत्री मंडळाचे आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News