गुगलच नव तंत्रज्ञान विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020

विद्यार्थ्यांना गणित हा विषय सर्वाधिक अवघड वाटतो मात्र, नव्या तंत्रज्ञानामुळे गणित सोडवणे सोपे जाणार आहे. हाताने किंवा टाईप केलेले गणित गुगल लेंस काही क्षणात सोडवले आणि गणित सोडवण्याची पद्धत युजर्स सांगणार आहे.

शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडतात, विविध समस्या निर्माण होतात, या समस्या सोडवण्यासाठी गुगलने एक नवे फीचर लॉन्च केले.  होमवर्क फीचरमध्ये गुगल लेंस समाविष्ठ करण्यात आले. हे फिचर विद्यार्थ्यांना गणित सोडवण्यापासून ते विविध भाषणांमध्ये लिहलेले मचकूर वाचण्यासाठी मदत करणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवणार आहे. 

विद्यार्थ्यांना गणित हा विषय सर्वाधिक अवघड वाटतो मात्र, नव्या तंत्रज्ञानामुळे गणित सोडवणे सोपे जाणार आहे. हाताने किंवा टाईप केलेले गणित गुगल लेंस काही क्षणात सोडवले आणि गणित सोडवण्याची पद्धत युजर्स सांगणार आहे. एखादे गणित अवघड असेल तर ते सोडवण्यासाठी इतर संकेतस्थळाचे पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे गुगल लेस ॲपचा वापर करून विद्यार्थ्यांना आता गणित सोडवणे सोपी होणार आहे. तसेच विविध भाषांमध्ये लिहिलेले शब्द हिंदी ट्रान्सलेट करून हिंदीमध्ये वाचायला मिळणार आहे. त्यामुळे आता विविध भाषेतील ज्ञान हिंदीत मिळू शकेल. 

गुगल लेंस होमवर्क फीचर ओपन करण्यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनच्या होम स्क्रीन वर जावे लागेल, होम बटन दाबून गुगल असिस्टंट ओपन करावे. तिथे गुगल लेंसचा पर्याय दिसेल, पर्यायावर क्लिक त्यानंतर गुगल लेस ओपन होईल, त्यासाठी कॉमेऱ्याला सहमती द्यावी लागेल. गुगल पिक्सेल आणि अँड्रॉइड वन प्लस स्मार्टफोनच्या कॉमेऱ्यात गूगल लेस उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त इतर युजर्स गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करु शकतात. कॉमेरा गणिताच्या प्रश्नासमोर घेऊन जावे, त्यानंतर गुगल लेंस प्रश्न स्कॅन करेल आणि प्रश्नाचे उत्तर सांगेल, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना सोपे आणि सरळ शब्दात गणिताची समीकरणे सोडवता येतील.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News