डॉक्टरांचे नेटकऱ्यांना चोख प्रतिउत्तर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 17 May 2020

कोरोनाच्या महामारीत डॉक्‍टर कशा प्रकारे जिवाची बाजी लावून काम करत आहेत, हे मांडणारा व्हिडीओ तेथील डॉक्‍टरांनी समाज माध्यमांवर टाकला आहे. 

मुंबई : शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन हॉस्पिटल) कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाजळच रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरू लागला होता. त्यानंतर सायन हॉस्पिटलवर टीकेची झोड उठली होती. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या महामारीत डॉक्‍टर कशा प्रकारे जिवाची बाजी लावून काम करत आहेत, हे मांडणारा व्हिडीओ तेथील डॉक्‍टरांनी समाज माध्यमांवर टाकला आहे. 

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीची दखल न घेता टीका केली जात असल्याबद्दल निवासी डॉक्‍टरांनी खंत व्यक्त केली आहे. कोरोनाची मुंबईतील स्थिती, डॉक्‍टरांचे परिश्रम, अपुरे पीपीई किट, रुग्णांची वाढती संख्या, डॉक्‍टरांवर होणारे हल्ले, सुरक्षेचा अभाव आदी मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या डॉक्‍टरांनी नागरिकांना "रातच राहा, सुरक्षित राहा", असे आवाहनही केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News