इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; शालेय अभ्यासक्रमावर आधारित मालिका लवकरच येणार सह्याद्री वाहिनीवर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने १४ मार्चपासून सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली.  त्यानंतर आता शाळांचे शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन सुरु झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा पुन्हा कधी उघडतील याची मात्र कोणीही शाश्वती देत नाही. कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढल्याने जरी शाळा सुरु होण्यास अडचणी निर्माण होत असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये याकरिता शासनाने सर्व शाळांना ऑनलाईन वर्ग भरविण्यास सांगितले आहे.

मुंबई :-  कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने १४ मार्चपासून सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली.  त्यानंतर आता शाळांचे शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन सुरु झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा पुन्हा कधी उघडतील याची मात्र कोणीही शाश्वती देत नाही. कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढल्याने जरी शाळा सुरु होण्यास अडचणी निर्माण होत असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये याकरिता शासनाने सर्व शाळांना ऑनलाईन वर्ग भरविण्यास सांगितले आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी पुरेश्या सोयी सुविधा नसल्याने त्यांना अभ्यासापासून वंचित राहावे लागत आहे. परंतु आता या सर्वांकरीता एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
पुण्याची स्वयंसेवी संस्था "एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन" ने इयत्ता पाहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या सत्रातील शिक्षण हे सह्याद्री वाहिनीवरून देण्याचे निश्चित केले आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर "टिलीमिली" हि नवी महामालिका सुरू केली जाणार आहे. ही मालिका २० जुलै पासून सह्याद्री वाहिनीवर सुरु केली जाणार असून यामुळे जवळपास  दीड कोटी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती एमकेसीएल संस्थेकडून मिळत आहे.
एमकेसीएलच्या या उपक्रमात शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या ग्राममंगल आणि इतर काही संस्थांच्या तज्ञ शिक्षकांचा यात समावेश असणार आहे. सह्याद्री वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या टिलीमिली ह्या मालिकेत बालभारतीच्या इयत्ता पहिली ते आठवी च्या अभ्यासक्रमातील सर्व पाठांचा समावेश असून या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कंटाळा आणणारी व्याख्याने नसतील तर विद्यार्थ्यांना त्यांचा जवळपासच्या परिसरात कृतिशील शैक्षणिक अनुभव कसे घेता येतील याविषयी माहिती या मालिकेत दिली जाणार आहे. टिलीमिली ही मालिका २० जुलै ते ६ सप्टेंबर या कालावधीत प्रदर्शित होणार असून ह्यामध्ये सर्व इयत्तांसाठी ४८० एपिसोड असतील. सह्याद्री वाहिनीवर ही मालिका रविवार सोडून रोज प्रक्षेपित केली जाणार असून या मध्ये, रोज एका इयत्तेसाठी एक असे  एका इयत्ते करीता ६० पाठ प्रदर्शित केले जाणार आहेत. २० जुलै पासून ही मालिका रोज ७:३० ते १२:३० ह्या वेळे दरम्यान प्रक्षेपित केली जाणार असून प्रत्येक इयत्ते करीता या मालिकेत अर्ध्या तासाचा वेळ देण्यात येणार आहे.
 
टिलीमिली मालिकेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे :-

  • इयत्ता आठवी - सकाळी ७:३० ते ८:००
  • इयत्ता सातवी -  सकाळी  ८:०० ते ८:३०
  • इयत्ता सहावी -  सकाळी  ८:३० ते ९:००
  • इयत्ता पाचवी -  सकाळी  ९:०० ते ९:३०
  • इयत्ता चौथी   -  सकाळी  ९:३० ते १०:००
  • इयत्ता तिसरी -  सकाळी  १०:०० ते ११:००
  • इयत्ता दुसरी  -  सकाळी  ११:०० ते १२:००
  • इयत्ता पहिली -  दुपारी    १२:०० ते १२:३०

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News