एमफिल व पीएचडी पेट परीक्षाधारकांना आनंदाची बातमी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

विपीएच.डी.साठी ७८ विषयांत; तर एम.फिल.साठी २५ विषयात ही प्रवेश परीक्षा होणार आहे. 

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. व एम.फिल. प्रवेश परीक्षा (पेट) ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या वर्षी प्रथमच या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करता येईल. या परीक्षांचे अर्ज भरण्यास २७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना १८ मार्चपर्यंत अर्ज करता येतील. या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विपीएच.डी.साठी ७८ विषयांत; तर एम.फिल.साठी २५ विषयात ही प्रवेश परीक्षा होणार आहे. 

प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन असून याचे शुल्कही ऑनलाईन भरता येईल. विद्यार्थ्यांना अर्जाची कोणतीही प्रत विद्यापीठात जमा करण्याची आवश्‍यकता नाही; परंतु सदर अर्जाची प्रिंटआऊट पुढील संदर्भासाठी काढून ठेवण्यात यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. पेट परीक्षेचे अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्‍यकता नाही. विद्यार्थ्यांनी प्रवेश पात्रता पाहूनच प्रवेश अर्ज भरणे आवश्‍यक आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन होणार नाही. या परीक्षेचे केंद्र मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातच असणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर भरता येतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News