खुशखबर !  40 क्रेडीट कोर्स मराठीत उपलब्ध ? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 June 2020

'विद्यार्थ्यांनी सर्वांधित नोंदणी केलेले 40 क्रिडीट कोर्स भाषांतरासाठी निवडण्यात आले. भाषांतराचे काम 'शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रांना' (ईएमआरसी) देण्यात आले. इंग्रजी कोर्सेसचे मराठीत भाषांतर करण्याचे काम सावित्रीबाई फुले विद्यावीठाच्या ईएमआरसी केंद्राला देण्यात आले.

पुणे : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर कौशल्याची आवश्यकता आहे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देणारे 40 क्रिडीट कोर्स मराठीत उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे भविष्यात राज्यातील मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. प्रादेशीक भाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले तर व्यवस्थित आकलन होते. आणि ते चिरकाळ टिकले. त्यामुळे स्वंयमने 40 क्रिडेट कोर्स आठ प्रादेशीक भाषेत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

'विद्यार्थ्यांनी सर्वांधित नोंदणी केलेले 40 क्रिडीट कोर्स भाषांतरासाठी निवडण्यात आले. भाषांतराचे काम 'शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रांना' (ईएमआरसी) देण्यात आले. इंग्रजी कोर्सेसचे मराठीत भाषांतर करण्याचे काम सावित्रीबाई फुले विद्यावीठाच्या ईएमआरसी केंद्राला देण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या ईएमआरसी केंद्राने आतापर्यंत 40 टक्के काम पुर्ण केले आहे. आणखी काही महिने काम पुर्ण होण्यासाठी लागणार आहेत' अशी माहिती केंद्राचे समन्वयक श्रीकांत ठाकूर यांनी दिली.   

काय करत स्वंयम पोर्टल? 

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी स्वंयम पोर्टल प्रयत्न करत आहे. सध्या स्वंयम संकेतस्थळावर 600 पेक्षा अधिक ऑनलाईनॉ स्किल कोर्सेस उपलब्ध आहेत. मात्र हे सर्व कोर्सेस इंग्रजी माध्यमातून शिकवले जातात. त्यामुळे प्रादेशीक भाषेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी कोर्सेस करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रादेशीक भाषेचे विद्यार्थी क्रेडीट कोर्सपासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी हिंदी, मराठी, तेलगू, तामिळ, गुजराथी, बंगाली, मल्याळम, कन्नड आठ प्रादेशिक भाषेत क्रेडीट कोर्स उपलब्ध होणार आहे.  

कोर्स मराठीत, उत्तर इंग्रजीत

विद्यार्थ्यांना 40 क्रिडेट कोर्स मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित आकलन होईल. मात्र क्रेडीट कोर्सेसच्या सर्व परीक्षा इंग्रजी माध्यमातून होणार आहे. त्यामुळे कोर्स मराठीत असला तरी उत्तरे इंग्रजीत लिहावी लागणार आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजीत उत्तरे लिहण्याचा सराव करावा लागेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News