वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी मिळणार चांगले जेवण आणि...  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

मध्यवर्ती स्वयंपाकघर सुरू करणार असून, वसतिगृहांतील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्हीही बसविणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मुंबई : राज्यात मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता राज्य सरकारकडून वसतिगृहे सुरू करण्यात आली. मात्र, यातील अनेक वसतिगृहांतील मुली व मुलांना चांगले जेवण मिळावे, यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर सुरू करणार असून, वसतिगृहांतील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्हीही बसविणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

विधानसभेत राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहे, आश्रमशाळा, तेथील भोजन व्यवस्थेचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करण्यात आला. त्यास उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. राज्यातील इतर जिल्ह्यातील वसतिगृहांच्या तुलनेत मुंबई, पुणे येथील वसतिगृहे बरे या परिस्थितीत आहेत. मात्र इतर वसतिगृहाची अवस्था फारच कठीण आहे. यातील अनेक इमारतींची नव्याने बांधणी, पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या सर्व इमारतींच्या सुधारणेचा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चांगले भोजन मिळावे यासाठी त्या जिल्ह्यातील पुरवठादार, ठेकेदारांना संधी दिली  जाईल असे ते म्हणाले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News