ते दिवस गेलेच...

दिपाली साळेकर-खामकर
Friday, 6 September 2019

आठवतात मग भांडणं वाद कलह सुद्धा
अश्रूंना तेव्हा डोळ्यातच अडवलं जातं.
अन् तू केलेली मनधरणी ही आठवते
तेव्हा मात्र एकांतातच मन हसत बसतं

कधीकधी वाटतं एकांतच मिळू नये
कारण तेव्हा फक्त तुलाच आठवलं जातं.
सगळ्याच आठवणी थव्यासारख्या येतात
तेव्हा मात्र मन फडफड करत बसतं.

आठवतात मग भांडणं वाद कलह सुद्धा
अश्रूंना तेव्हा डोळ्यातच अडवलं जातं.
अन् तू केलेली मनधरणी ही आठवते
तेव्हा मात्र एकांतातच मन हसत बसतं.

विषय अनेक डोक्यात असतानाही
तुझ्यावरच खुप लिहावस वाटतं.
तुझ्यामुळे लिहिल्या गेलेल्या कवितांना
लिखाण साहित्यात गणलं जातं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News