गोंदियाचा प्रतापगड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 April 2020

किल्ल्याची चढाई पायथ्यापासून 200 मीटर आहे. या जंगलात किलोमीटरभर चालत कड्याच्या पायथ्याला येता येते. या कड्यावर मधमाश्यांची असंख्य पोळी लटकलेली दिसतात.

विदर्भामध्ये गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात अर्जुनी मोरगाव हा तालुका आहे. गोंदिया रेल्वे मार्गानी जोडलेले आहे. गोंदिया-सडक अर्जुनी-अर्जुनी मोरगाव असा गाडी रस्ता आहे. हा गाडी रस्ता नवेगाव बांध या गावाजवळून जातो. नवेगाव बांधपासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गोठणगावाकडे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. अर्जुनी मोरगाव कडूनही १६ कि.मी. अंतरावर गोठणगाव आहे. गोठणगाव तिबेटी लोकांच्या वसाहतीमुळे या भागात प्रसिध्द आहे.

किल्ल्याची चढाई पायथ्यापासून 200 मीटर आहे. या जंगलात किलोमीटरभर चालत कड्याच्या पायथ्याला येता येते. या कड्यावर मधमाश्यांची असंख्य पोळी लटकलेली दिसतात.

या कड्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर उजवीकडे चढाई सुरू करावी. जुना मार्ग दगड धोंडे पडून नष्ट झालेला आहे. डावीकडे ठेवीत आपण १५ मिनिटांत तटबंदीमध्ये प्रवेश करतो. हा एका माचीचा भाग असून तो रचिव तटबंदीने सरंक्षीत केलेला आहे. गड आणि परीसरामध्ये घनदाट जंगल आहे. या भागात अस्वले खूप आहेत. अस्वल जंगलातील अतिशय धोकादायक प्राणी आहे. या माचीपासून थोडे वर आल्यावर उजवीकडील बुरूजावर एक कबर आहे. तेथे झेंडे लावलेले दिसतात. डाव्या बाजूला तटबंदी आहे. येथून एक वाट बालेकिल्ल्यामागील भल्या मोठ्या माचीकडे जाते. या माचीवर घनदाट जंगल आहे. ही गडाची पश्चिम बाजू असून ती तटबंदीने पूर्णत: वेढलेली आहे. या जंगलात पाण्याचा तलावाचे अनेक अवशेष दिसतात.

या कबरीपासून डावीकडील तटबंदीकडे पायऱ्या गेलेल्या आहत. बुरूजाच्या बाजूने पडक्या तटबंदीमधून गडप्रवेश करावा लागतो. डावीकडील वाटेने मोठ्या तलावाजवळून गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे जाता येते. माथ्यावर काही चौथरे पडलेले असून ते एका तटबंदीने वढलेले आहेत. पश्चिम कड्यावरून दूरपर्यंतचा परिसर पहाता येतो. इटियाडोह प्रकल्पही येथून दिसतो. पश्चिमेकडील माचीचे उत्तम दर्शन येथून होते. कड्याच्या कडेकडेने उत्तर बाजूच्या कड्यावर येता येते. 

येथे अनेक नैर्सिक गुहा असून वन्य श्र्वापदांचा वावरही आढळतो. येथे खाली तळघर आहे. येथून एक वाट खालच्या पश्चिम माचीवर जाते. गडाची नैसर्गिक अभेद्यता येथून दृष्टीस पडते. देवगडाच्या गौंड राजांच्या अखत्यारीतील हा दुर्गम किल्ला आज तरी बेसाऊ झालेला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News