कुस्तीपट्टू दिव्या काकराची सोनेरी कामगिरी

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Thursday, 20 February 2020

आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून दिव्याने आपल्या देशाचे नाव हे आणखी उज्वल केले आहे ह्यामध्ये मात्र शंका नाही. 

मुंबई :  कुस्तीपट्टू म्हणून स्वतःच्या खेळाची वेगळीच अशी चुणूक दाखवणारी भारतीय महिला कुस्तीपट्टू दिव्या काकरा हि सध्या जगभरात चांगलीच चर्चेत आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या खेळाची विजयी घोडदौड कायम राखणारी दिव्या ही  सध्या देशभर चांगलीच प्रकाशझोतात आली आहे.

आपल्या खेळाच्या सुरुवातीलाच तेसुद्धा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सुवर्ण पदकावर आपले विजयी नाव कोरले आहे.त्यामुळे दिव्यावर विविध मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून दिव्याने आपल्या देशाचे नाव हे आणखी उज्वल केले आहे ह्यामध्ये मात्र शंका नाही. ६८ किलो वजनी गटात हा सामना "गॉल रॉबिन "या पॅटर्न मध्ये पार पडला.

या सामन्यांमध्ये दिव्या कांकरा हिने  कझाकिस्तान,मंगोलिया,उझबेकिस्थान आणि जपान संघाच्या खेळाडूंना पराभवाची धूळ चारत सुवर्ण पदक पटकावले. आशियाई कुस्ती स्पर्धेच्या सुरुवातीलाच तेसुद्धा अवघ्या तिसऱ्या दिवशी मिळवलेले  दुसरे सुवर्ण पदक हे नक्कीच भारताची मान उंचावणारे ठरेल हे मात्र नक्की. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News