तरुणांसाठी सुवर्णसंधी MPSC मार्फत ८०६ जागांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

अर्ज करण्याची मुदत
१९ मार्च २०२० पर्यंत
परीक्षेची तारीख : तीन मे २०२०
अर्जासाठी संकेतस्थळ
www.mahampsc.gov.in

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि साहाय्यक कक्ष अधिकारी या वर्ग ‘ब’च्या ८०६ जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ६५०  फाैजदारपदांचा समावेश आहे. 

शासकीय पदांची भरती महापरीक्षा पोर्टलमधून केली जात होती. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याने ते नुकतेच बंद केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही भरती ‘एमपीएससी’कडूनच व्हावी, अशी मागणी केली आहे. परंतु सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यातच आता गृह, वित्त आणि सामान्य प्रशासन विभागातील रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांना खूष करण्याचा प्रयत्न झाला आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित ‘गट ब’साठी संयुक्त पूर्व परीक्षा तीन मे रोजी राज्यातील ३७ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. यामध्ये पोलिस उपनिरीक्षकाची ६५० पदे आहेत. त्यापैकी महिलांसाठी १९५, खेळाडूंसाठी ३२ आणि अनाथांसाठी ६ पदे आरक्षित आहेत.

८९ राज्य करनिरीक्षक पदे भरली जातील. त्यात २७ महिला, खेळाडूंसाठी चार जागा आहेत. साहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठीच्या ६७ पैकी २० जागा महिलांसाठी, तर ३ जागा खेळाडूंसाठी आरक्षित आहेत. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News