नविन कलांकारांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी..!

रसिका जाधव
Saturday, 8 August 2020
  • आपल्या सर्वांमध्ये काही ना काही वेगळेपण दडलेले असते त्याच वेगळेपणामुळे आपण आपल्या समजात स्वत:चे एक अस्तित्व निर्माण करतो.
  • परंतु हे अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही वेळा व्यासपीठ मिळणे आवश्यक असते.

मुंबई :- आपल्या सर्वांमध्ये काही ना काही वेगळेपण दडलेले असते त्याच वेगळेपणामुळे आपण आपल्या समजात स्वत:चे एक अस्तित्व निर्माण करतो. परंतु हे अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही वेळा व्यासपीठ मिळणे आवश्यक असते. त्यामुळे २१ व्या शतकाच्या टेक्नोसॅव्ही युगात टेक्नॉलॉजीचा सफाईदारपणे वापर करत सामान्य घरातील तसेच तळागाळातील कलाकारांना त्यांच्या अंगात दडलेल्या गुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, म्हणून मी मराठी स्टार उत्सव मनाचा ह्या युट्युब चॅनलने स्वतःहून पुढाकार घेत कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

नविन कलाकारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ते ही, या लाकडाऊनच्या काळात मग या सुवर्णसंधीचा फायद घेऊन या संधीचे सोने केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे सगळेच गेली सात महिने घरीच आहेत. काहींना काम देखील नाहीत त्यांचे एक वेळच्या जेवण्याचे देखील आहेत. परंतु त्यांच्याकडे हे गुण असतील तर त्यांनी या संधीचा नक्कीच उपभोग नक्की घ्यावा. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. पहिल्या तीन विजेत्यांना रोक रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. पहिल्या दहा उत्तेजनार्थ विद्यार्थांना बक्षिस दिली जाणार आहेत आणि सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव देखील केला जाणार आहे.

यासाठी कलाकारांना फक्त त्यांच्यातील जी कला आहे त्याचा एक व्हिडिओ करून "होऊ दे कल्ला" या स्पर्धे अंतर्गत दिलेल्या संपर्क क्रमांकावर ०८६२५०२५६७८ हा व्हिडिओ पाठवावा. हा व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२० आहे. आता तुम्हाला देखील तुमचे स्वप्न साकार करता येणार आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या कलाकारांस रोक रक्कम ५०,००० रूपये सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र आहे. व्दितीय क्रमांक मिळणाऱ्या कलाकरांस रोक रक्कम २५,००० रूपये सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र आहे. तसेच तृतीय क्रमांक काढणाऱ्या कलाकारांस रोक रक्कम १५,००० रूपये सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र आहे. एवढेच नव्हे तर बक्षीसासह तुम्हाला चित्रपट आणि वेब सिरिजमध्ये काम करण्याची संधी देखील मिळू शकते.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News