उस्मानाबादमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पाहा जाहीरात, करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यात विविध पदे भरण्यात येणार आहेत.

उस्मानाबाद : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे संसाधने आणि मणूष्यबळ असल्यामुळे आरोग्य विभागाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहे. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यात विविध पदे भरण्यात येणार आहेत. या जागा केवळ कंत्राटी स्वरुपाच्या असतील. थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे.

पदाचे नाव आणि तपशील :  

अनु. क्र    पदांचे नाव                     पदे
१.           फिजिशियन               ०१                     
२.           पॉथोलॉजिस्ट         ०१
३.           वैद्यकीय अधिकारी          ०१
४.        आयुश वैद्यकीय अधिकारी   ०१      
५.        एक्स- रे टेक्निशियन           ०१
६.        सिटी स्कॉन  टेक्निशियन     ०१        

 शैक्षणिक पात्रता :

अनु. क्र.१ :  
एम,डी मेडीसीन/डीएनबी
वेतन- ७५ हजार

अनु. क्र.२ :  
एमबीबीएस एम. डी पॉथोलॉजिस्ट डीसीपी, 
एमएमसी प्रमाणपत्र आवश्यक
वेतन- ७५ हजार

अनु. क्र.३ :  
एमबीबीएस 
वेतन- ६० हजार

अनु. क्र. ४ :  
बीएएमएस
वेतन- २८ हजार

अनु. क्र. ५ :  
दहापी पास आणि २ वर्षाची पदवी
एक्स- रे टेक्निशियनचा किमान १ वर्ष अनुभव असावा
वेतन- १७ हजार

अनु. क्र. ५ :  
दहापी पास आणि २ वर्षाची पदवी
सिटी स्कॉन टेक्निशियनचा किमान १ वर्ष अनुभव असावा
वेतन- १७ हजार

वयोमर्यादा:

खुल्या प्रवर्गातली उमेदवारांसाठी ३८ वर्षे, मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षापेक्षा अधिक नसावे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 

०४ ऑगस्ट २०२० सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

अर्ज सादर करण्याचे ठिकाण:

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे अर्ज सादर करावे.

अर्ज कसा करावा :

उमेदवारांनी खाली दिलेल्या नमुन्यास सर्व माहिती लिहून प्रत्यक्ष सादर करावी. ऑनलाईन किंवा पोस्टाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, पासपोर्ट साईज फोटो चिटकावून सादर कारायचा आहे.

अधिक माहतीसाठी: 

http://www.solapurcorporation.gov.in/

अर्जाचा नमुना आणि संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

https://drive.google.com/file/d/1Gnat_6A4zpNMR5-WMJ-j5XpTkW8u3RZo/view 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News