रवीकिरणांचा सोनेरी रंग अन पिवळा धमक हॅपी वूमन स्ट्रीट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 1 March 2020

ढोल-ताशाचा ताल अन फुगडीही
ढोल-ताशाच्या तालावर बेधुंद नाचण्याची पुरुषांची मक्देतारी नाही, हे या उपक्रमात महिलांनी दाखवून दिले. या तालावर बेधुंद नाचत व फुगडी खेळत एकमेकींना महिलांनी अलिंगण दिले. आता पुढच्या वर्षी भेटू, असे सांगत कार्यक्रम समारोपाकडे गेला.

नगर - भल्या पहाटे साडेपाच वाजताच बोचऱ्या थंडीत तो रस्ता गजबजला.. बघता बघता गर्दीचा उच्चांक झाला... योगासने, झुम्बा डान्स, लाइव्ह बॅंड, पॉवर गरबा, फिल्मी गाण्यांच्या तालावर महिलांचे पाय थिकरले... मुलगी-आई, सासू-सून भन्नाट नाचल्या... रविकिरणांच्या सोनपावलासोबत पिवळी थिम घेतल्याने याच रंगांचे वेष परिधान केलेल्या महिलांमुळे नगरचा प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक हळद लावल्यासारखा पिवळा झाला होता... निमित्त होते हॅपी वूमन स्ट्रीटचे...

 

जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर लॅक्मे फर्म आयोजित व सकाळ माध्यम समूह माध्यम प्रायोजिक हॅपी वूमन स्ट्रीट हा उपक्रम आज दिमाखात झाला. या उपक्रमाच्या आयोजक कल्याणी गौरव फिरोदिया व `सकाळ`चे कार्यकारी संपादक अॅड. डॉ. बाळ. ज. बोठे पाटील यांच्या कुशल इव्हेंट मॅनेजमेंटचे दर्शन आचंबित करणारे ठरले. हे या उपक्रमाचे सहावे वर्ष होते. हा उपक्रम आता प्रत्येक वर्षी गर्दीचा उच्चांक करीत आहे. महिलांना आत्मसन्माने व्यक्त होता यावे, त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा, नवीन संधी मिळावी, मैत्रीणी जोडाव्यात, महिलांचे ग्रुप तयार व्हावेत, त्यानिमित्ताने एकमेकींमध्ये सुख-दुःखाच्या गुजगोष्टी व्हाव्यात, धावपळीच्या युगात महिलांनी स्वतःकडेही लक्ष द्यावे, यासाठी आवश्यक असणारे व्यायामाचे प्रकार माहिती व्हावेत, एकूणच महिलांचे जीवन अधिक सुंदर होण्याच्या मुख्य उद्देशाने आयोजित होत असलेला हा उपक्रम आगळा-वेगळा ठरला.   

 

सिल्क योगा, पॉवर गरबा अन् खूप काही
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे योगासनांचे प्रकार, सिल्क योगा, डान्स योगा, लाइव्ह बॅंण्ड, झुम्बा, पॉवर गरबा हे या उपक्रमाचे आकर्षण ठरले. शिवम टिव्हीएसने आयोजित केलेल्या विविध खेळांना महिलांची विशेष पसंती ठरली. झुम्बा फिटनेसच्या रुपाली लोखंडे व त्यांच्या टीमने सादर केलेल्या झुम्बा डान्सवर महिला मनसोक्त थिकरल्या. अहमदनगर मल्लखांब व योगा सेंटरच्या प्राजक्ता दळवी व तांडव डान्सच्या मनिषा चनेजा यांच्या ग्रुपचे योगासने खेचक ठरले. यामध्ये लहान मुलींचे योगासने विशेष कौतुकास्पद ठरले. लाइव्ह बॅंडचे पिटर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी वाजविलेले सिंथेसायझर, कॅशिओ, गिटार वादनाला टाळ्या पडल्या. कोअर फिटनेसच्या सोनल मध्यान व त्यांच्या टीमने सादर केलेल्या फिटनेसच्या टीप्स व पंजाबी गाण्यांना महिलांची विशेष पसंती दिसून आली. डान्स फिटनेस स्टुडिओचे व्हिक्टर मावेली यांनी हिंदी गाण्याच्या तालावर सर्वांनाच नाचायला लावले. ट्रॅक कॅम्पचे विशाल लाहोटी यांनी दिलेली माहिती उत्सुकतेने महिला घेत होत्या. महावीर मल्लखांब आणि योगा ट्रेनिंग सेंटरचे उमेश झोटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबावर मुलींनी कसरती केल्या. गोल्ड जीमचे गौरव फिरोदिया यांच्या टिमने जीममधील महिलांसाठीचे व्यायाम सांगितले. रॅम्पवर तर पाच वर्षाच्या मुलीपासून ते साठ वर्षाच्या आजीबाईंनी प्रदर्शन केले. सोलफूल म्युझिक क्रिव्हच्या गिरिराज जाधव यांनी तर सर्वांनाच गायनाला भाग पाडले. द व्हॅक्शन स्टुडिओ टुर्सचे सुहास विश्वासराव हे टुर्सविषयी माहिती देत होते. झुम्बा डॉन्सच्या स्वप्नाली जंबे यांच्या टीमसोबत महिलांनी झुम्बा डान्सचा आनंद घेतला. श्रद्धाज कॉक फिटनेसच्या श्रद्धा देवगावकर यांच्या टीमने फिटनेसचे विविध प्रकार सादर केले. फ्युजन अॅकॅडमीच्या शितल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली झुम्बा, अॅरोबिक डान्स, पॉवर योगा महिलांच्या विशेष पसंतीस पडला.

ढोल-ताशाचा ताल अन फुगडीही
ढोल-ताशाच्या तालावर बेधुंद नाचण्याची पुरुषांची मक्देतारी नाही, हे या उपक्रमात महिलांनी दाखवून दिले. या तालावर बेधुंद नाचत व फुगडी खेळत एकमेकींना महिलांनी अलिंगण दिले. आता पुढच्या वर्षी भेटू, असे सांगत कार्यक्रम समारोपाकडे गेला.

सहा वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये असा उपक्रम पाहिला होता. नगरलाही तो सुरु करावा, यासाठी मी सहा वर्षांपूर्वी `हॅपी वूमन स्ट्रीट` हा उपक्रम सुरू केला. सकाळ माध्यम समुहाने त्यासाठी मोठे सहकार्य केल्यानेच या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांचा आनंद हाच माझ्यासाठी मोठा आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, महिलांनी केवळ चूल आणि मुल या संकल्पनेत अडकून न पडता घराबाहेर पडावे. कुटुंबाची काळजी घेता तसे स्वतःकडे लक्ष द्यायला हवे, असे आवाहन हॅपी वूमन स्ट्रीटच्या आयोजक कल्याणी फिरोदिया यांनी व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News