‘तुस्सी जा रहे हो, तुस्सी ना जाओ’

काजल डांगे
Saturday, 8 June 2019

लव्ह ट्रॅंगल असलेला चित्रपट १९९८मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपरडुपर हिट ठरला. या चित्रपटामधील बालकलाकार परझान दस्तुरची भूमिका विशेष भाव खाऊन गेली.

किंग खान शाहरूख, काजोल, राणी मुखर्जी या त्रिकुटाचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है ।’ शाहरूख, काजोल आणि राणी यांचा लव्ह ट्रॅंगल असलेला हा चित्रपट १९९८मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपरडुपर हिट ठरला. एवढंच नव्हे; तर नव्वदच्या दशकातील सुपरहिट चित्रपटांमध्ये ‘कुछ कुछ होता है’चे नाव आवर्जून घेतले जाते. रोमान्स किंग शाहरूखचा या चित्रपटातील अभिनय पाहून तर लाखो तरुणी त्याच्या प्रेमात पडल्या.

शिवाय राणी-काजोलनेही शाहरूखला या चित्रपटात उत्तम साथ दिली. या चित्रपटातील इतर पात्रंही प्रेक्षकांच्या तितकीच लक्षात राहिली. शाहरूखचे या चित्रपटातील काही रोमॅण्टीक संवाद तर गाजलेच. पण त्याचबरोबरीने या चित्रपटामधील बालकलाकार परझान दस्तुरची भूमिका विशेष भाव खाऊन गेली.

परझानने खरं तर या चित्रपटात ‘सायलेंट’ मुलाचं पात्र साकारलं. पण चित्रपट शेवटाकडे असतानाच त्याने म्हटलेला एक संवाद प्रचंड हिट ठरला. आणि तो संवाद म्हणजे, ‘तुस्सी जा रहे हो, तुस्सी ना जाओ’. परझानने केविलवाणं तोंड करून काजोलला म्हटलेला हा संवाद ऐकताच चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही हास्य उमललं.

परझानला आजही या संवादामुळेच ओळखलं जातं. करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली. शिवाय या चित्रपटाचे लिखाणही करणनेच केले होते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News