गर्दीत जाण्यापूर्वी अशी 'घ्या' स्वत:ची काळजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 September 2019

गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका, ढोल, ताशा, गणपती, सजावट पाहण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी होत असते. या गर्दीमध्ये जाण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका, ढोल, ताशा, गणपती, सजावट पाहण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी होत असते. या गर्दीमध्ये जाण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीत फिरणे, अवेळी जेवण करणे, गोडाधोडाचे जेवण यांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

गणेशोत्सवाच्या काळात पाऊस पडत असल्याने गर्दीच्या ठिकाणी साथीचे आजार होण्याची शक्यता असते. तुम्हाला सर्दी, खोकला, ताप यांपैकी कोणतीही लक्षणे असल्यास बाहेर पडू नका. गर्दीत गेल्याने तुमचा आजारही वाढण्याची शक्यता असते. गणपतीचे दर्शन व देखावे पाहण्यासाठी खूप गर्दी होत असते, अशावेळी गर्दीत शिरताना मास्क किंवा स्कार्फचा नेहमी वापर करा. त्यामुळे साथीच्या आजाराची लागण होणार नाही. 

चेहराही व्यवस्थित राहील आणि आरोग्यही तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. गणेशोत्सवात फिरताना कापूरवडी सोबत ठेवा. त्यामुळे अनेक त्रास कमी होतात. ज्यांना अस्थमा (दमा), जुना खोकला, उच्च रक्तदाब आहे अशा व्यक्तींनी गर्दीत गेल्यास आजारांचे जोरदार अटॅक येऊ शकतात. त्यामुळे कापराचा वास घेत राहिल्यास गर्दीत घुसमट झाली, तरी त्रास होणार नाही. गर्दीच्या ठिकाणी अनेक फेरीवाले तुम्हाला दिसतील. हे उघड्यावर विकले जाणारे अन्नपदार्थ खाणे टाळा. अशा खाण्याने उलट्या, जुलाब, आमांश, टायफॉईड, कावीळ असे आजार उद्‍भवतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News