"या" मंदिरातील देवी दिवसातून तीन वेळा बदलते रंग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 31 December 2019

मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये असलेले पचमठा मंदिर कितीतरी गोष्टींमध्ये वेगळे आहे. या मंदिरात वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मूर्त्या स्थापित आहे.

भारतात वेगवेगळ्या जाती आहेत तसेच वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळे देव आहेत. काही भारतीय लोक जादू-टोणा. चमत्कार, अंधश्रध्दा, पाखंडी बाबा या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतात. तसेच काही लोक जातींभेद करताना दिसून येतात. शेवटी तो त्यांच्या जीवनातील श्रद्धेचा भाग असतो. आपण त्यांना काही बोलू शकत नाही. पाहिल्याच्या काळात लोकांकडे काम नव्हती त्या वेळेला सर्व लोकं देव सगळ ठीक करेल असे म्हणायचे, आतासुद्धा करत असतात. परंतु काही लोकांचा देवावर जरासुद्धा विश्वास नसतो.

तसेच काही लोक देवाचे अस्तित्व आहे असे म्हणतात, तर काही लोकं देवाचे अस्तित्व नाही असं म्हणतात. देव ही संकल्पना आपल्या निराश मनाला उभारी देणारी आहे. आता ही शक्ति खरी हा वेगळा मुद्दा झाला. पण कधी कधी अश्या गोष्टी दिसतात ज्या आपल्याला खरंच या जगात दैवी शक्ती आहे यावर विचार करण्यास भाग पाडतात. भारतीय स्थापत्यशास्त्र हा विषय अभ्यास करण्यासारखा आहे. संशोधक जुन्या संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी विशेषकरुन जुन्या बांधकामांचा अभ्यास करतात.

यातून अस्तित्वात नसलेल्या संस्कृतीची ओळख होते. भारतात देवांची मंदिर सुद्धा वेगवेगळी करण्यात आली आहे, आणि त्या मंदिराची उभारणी करण्यासाठी राजांनी कोट्यावधी रुपये खर्च केली आहे.  ही मंदिरं विलोभनीय आहेतच, पण त्यांच्या स्थापत्यशास्त्रात काहीतरी वेगळेपणा आहे. आता आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल. मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये असलेले पचमठा मंदिर कितीतरी गोष्टींमध्ये वेगळे आहे. या मंदिरात वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मूर्त्या स्थापित आहे.

या मंदिरात राधाकृष्णाचा विशेष उस्तव साजरा केला जातो. पण या मंदिरात असलेल्या देवी लक्ष्मीच्या प्राचीन मूर्तीविषयी येथे एक कथा प्रचलित होते. या मंदिरात स्थापित केलेली मूर्ती दिवसातून तीन वेळा रंग बदलते असे येथील भक्तांचे आणि तेथील पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. दर्शन घेणाऱ्या भक्तांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ही मूर्ती पांढरी, दुपारी पिवळी आणि संध्याकाळी निळ्या रंगाची होते.

हे मंदिर जवळपास अकराशे वर्षाआधी तयार करण्यात आले आहे, असे मंदिराच्या पुजाऱ्यांचे असे म्हणणे आहे. त्याचबरोबर अजून एक खास गोष्ट या मंदिराविषयी प्रचलित आहे, जिच्यानुसार आजही सूर्याची पहिली किरण देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या चरणावर पडते. असे हे पचमठा मंदिर खूपच अद्भुत आणि इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही मध्यप्रदेशला फिरायला जाल तेव्हा या मंदिराला नक्की भेट द्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News