यंदा घरातूनच बकरी ईद

सारा खान
Saturday, 1 August 2020
  • बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण आहे. या सणाला ईद-उल-आधा असं सुद्धा म्हंटले जाते अनेक वर्षांपासून या सणाला खूप महत्व आहेच पण या सणाचा इतिहास देखील तितकाच महत्वाचा आहे.

बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण आहे. या सणाला ईद-उल-आधा असं सुद्धा म्हंटले जाते अनेक वर्षांपासून या सणाला खूप महत्व आहेच पण या सणाचा इतिहास देखील तितकाच महत्वाचा आहे. ईद-उल-आधा या दिवशी मुस्लिम इब्राहिमच्या मुलाची म्हणजेच इस्माईलची कुरबानी देत असताना अल्लाच्या आदेशामुळे मेंढीची बळी दिली तेव्हा पासून आतापर्यंत अनेक घरांमध्ये दर वर्षी या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. मित्र व परिवारातील सर्व लोकांसोबत शेवयांचा आनंद ह्या दिवशी घेतला जातो. प्रत्येक घरामध्ये एका बकरीची कुरबानी दिली जाते.

या वर्षी कोरोना महामारीमुळे हा सण सुरक्षित राहूनच साजरा करण्याचे निर्धार मुस्लिम बांधवांनी केला आहे. या सणाला नवीन कपडे घेतले नाही तरी नवीन विचार सोबत घेऊन सुरक्षिततेचा नारा सगळेजण देणार आहेत. दरवर्षी आमच्या घरी खूप पाहुणे हा सण साजरा करण्यासाठी येत असतात . आता आम्ही ऑनलाईन कॉलव्दारे सर्व नातेवाईकांशी भेट घेणार आहोत आणि हा सण साजरा करणार आहोत. ‌आपल्यावर संकटं जरी असले तरी लढत, आनंदात जगण्याची ताकद आपल्याला सोबत आहे. शेवटी एवढचं म्हणेल कि

'घरी राहून सुरक्षित बकरी ईद साजरी करा'

ईद-उल-आधा मुबारक.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News