गोव्याचे जलतरण संघ जाहीर
पणजी - गोवा जलतरण संघटनेने आगामी राष्ट्रीय सबज्युनियर व ज्युनियर जलतरण स्पर्धेसाठी गोव्याचे संघ जाहीर केले आहेत. राष्ट्रीय स्पर्धा गुजरातमधील राजकोट येथे २६ ते ३० जून या कालावधीत होईल.
सबज्युनियर संघात आदि सिग्नापूरकर, रिपुदमन सेखावत, झॅक फुर्तादो, स्वयम काकोडकर, आकर्ष मथियान, ड्वेन क्लेमेंत, नील पेडणेकर, चिन्मय मणेरकर, सौरभी नाईक, निरंजनी बोर्डे, हंसिका वेळुसकर, जियाना अल्वारिस, मिनोष्का परेरा, पूजा राऊळ, टिसा रघूबन्स, प्राची साळकर, ॲल्थिया कार्दोझ व लिला कांदोळकर यांचा समावेश आहे.

ज्युनियर संघात सय्यद झिदान इक्बाल, यश गावकर, नॅथन डिलिमा, श्याम सिग्नापूरकर, सागर पाटील, शोआन गांगुली, व्यान अल्वारिस, जॉन विलकॉक्स, अभिषेक फडके, यश मुरगोड, श्रृंगी बांदेकर, मिथिका कारापूरकर, तनिशा मुरगोड, नेहा दास, संजना प्रभुगावकर, सिंथिया चौधरी, गौरी हळर्णकर, अलाका ब्रिटो, दुर्वा महाले यांची निवड झाली आहे.
गोवा जलतरण संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल मडगावकर, गोवा जलतरण संघटनेचे प्रशिक्षक सुरजित गांगुली, डायव्हिंग प्रशिक्षक पी. नरसिंहमलू, एनआयएस प्रशिक्षक आफ्रा शेख, पालक प्रतिनिधी बर्ना प्रभू, राज्य संघटनेचे सचिव सय्यद अब्दुल माजीद यांचा समावेश असलेल्या निवड समितीने संघ निवडला आहे. स्पर्धापूर्व सराव शिबिर पेडे-म्हापसा येथील तरण तलावात सुरजित गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते २२ जून या कालावधीत होईल. पहिल्या दिवशी संध्याकाळी चार वाजता शिबिरास निवड होईल.