गोवा का पाहावा?

सोनल मंडलिक, यिनबझ
Saturday, 1 June 2019

गोवा म्हणजे तरुणाईला आकर्षण करणार ठिकाण, एक असं ठिकाण जिथे जाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. सुट्टीमध्ये ट्रिप प्लॅन करायचं म्हटलं की गोव्याचं नाव हे असतंच.. 

गोवा म्हणजे तरुणाईला आकर्षण करणार ठिकाण, एक असं ठिकाण जिथे जाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. सुट्टीमध्ये ट्रिप प्लॅन करायचं म्हटलं की गोव्याचं नाव हे असतंच.. 

गोव्यात पाहण्यासारखी अनेक स्थळ आहेत. भव्यदिव्य क्रूझ, लक्षणीय चर्च, मोठं-मोठे मार्केट्स..! मात्र याहून महत्वाची पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे गोव्यातील अथांग समुद्रकिनारे..! क्षितीजाच्या पलीकडे पाहायला भाग पडतील असे समुद्रकिनारे गोव्यात आहेत. शांत वातावरण, कसलाही गोंधळ किंवा गोंगाट नसलेला असा येथे परिसर आहे.
  
मुंबईतदेखील अनेक चौपाट्या आहेत, मात्र आपण पाहिलं तर त्याठिकाणी वेगळी परिस्थिती पाहायला मिळेल. जुनं गोवा आणि नवीन गोवा यामधील वेगळेपण येथील लोकांनी जपलं आहे. पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेलं गोवा आता मोठं हब होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गोवा शिपयार्ड याठिकाणी गेल्यावर त्याचा सहज अंदाज येतो. भारतीय नौसेना तसेच इतर देशातील मोठं मोठ्या जहाजांची निर्मिती आणि दुरुस्ती याठिकाणी केली जाते. गोव्यातील समुद्रात चकमकणाऱ्या क्रूझ गोव्याच्या समुद्रकिनार्यांची शान वाढवतात. याशिवाय ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने राहत असलेल्या गोव्यात चर्चची संख्या देखील तेवढीच आहे. मात्र या चर्चची रचना, तेथील परिसर, आणि संस्कृती याच दर्शन चर्चच्या माध्यमातून घडतं. त्यामुळेच हजारो पर्यटकांच्या गर्दीत देखील या सगळ्या वातावरणातुनच मनाला एक शांती मिळते.  सुट्टी, मज्जा मस्ती करायची म्हणून गोव्यात जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.. मात्र शांत आणि एकांतपणा पाहिजे असल्यास गोव्यातील समुद्रकिनारे आणि चर्च नक्की पहावेत.. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News