गोव्यात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली नवी नियमावली...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 June 2020

गोवा राज्य कोरोनामुक्त असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रूग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी नियमांमध्ये बदल केले आहेत. तसेच परराज्यातून येणा-या प्रत्येकाची चाचणी करण्यात येणार आहे अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. 

महाराष्ट्र - मागील तीन महिन्यांपासून गोवा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तुरळक प्रमाणात झाल्याचं आपण पाहतोय. तसेच तेथील मुख्यमंत्र्यांनी एप्रिलमध्ये कोरोनामुक्त राज्य सुध्दा घोषित केलं होतं. पण काही दिवसांपूर्वी गोव्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्याने लोकांच्या मनात भय निर्माण झाले आहे. त्यातचं कोरोनाचा पहिला बळी गेल्याचं आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी घोषित केलं. 

गोव्यातील मोरलेम येथील ८५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. मृत व्यक्तीला कोरोनाचे निदान झाल्यानंतर तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याबरोबर गोव्यातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत असल्याचे सुध्दा राणे यांनी सांगितले. 

गोवा राज्य कोरोनामुक्त असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रूग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी नियमांमध्ये बदल केले आहेत. तसेच परराज्यातून येणा-या प्रत्येकाची चाचणी करण्यात येणार आहे अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. 

परराज्यातून येणा-या प्रत्येक व्यक्तीला १४ दिवस होम क्वारंटाईन करून घ्यावे लागेल. यासर्व हालचालीवर प्रतिनिधींचे बारकारईने लक्ष राहिल. जर एखाद्याला घरी जायचं नसेल, तर त्याला संस्थात्मक क्वारंटाइनचा पर्याय उपलब्ध असेल, त्यासाठी शुल्क आकारले जाईल. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती काही दिवसांसाठी गोव्यात येत असेल त्याला कोरोना चाचणी करावी लागेल मगच राज्यात प्रवेश दिला जाईल असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News