अयोध्येला जा,पण इतिहास विसरू नका; मनसेचा ठाकरे सरकारवर आक्रोश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020
  • अनेक वर्षांपासून अनिर्णित असणारा अयोध्येतील रामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल ९ नोव्हेंबर रोजी देण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर रोजी रामलल्लाच्या दर्शनाला येणार असल्याची घोषणा केली होती.

मुंबई : अनेक वर्षांपासून अनिर्णित असणारा अयोध्येतील रामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल ९ नोव्हेंबर रोजी देण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर रोजी रामलल्लाच्या दर्शनाला येणार असल्याची घोषणा केली होती. परंतु काही कारणास्तव त्यांनी हा दौरा रद्द करून येत्या ७ मार्चला शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार असल्याचे सांगितले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अयोध्येचा दौरा केला होता. सत्ता स्थापनेसाठी होणाऱ्या विलंबामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांचा २४ तारखेचा दौरा रद्द केला. मात्र  उद्धव ठाकरेंनी विलंबित केलेल्या त्यांच्या दौऱ्यावर मनसेने चांगलेच तोंडसुख घेतले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ''प्रभू रामांनी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून आपलं राज्य भरताच्या हाती देऊन १४ वर्षे वनवास भोगला. परंतु त्यावेळी भरतने स्वतःचा स्वार्थ न पाहता प्रभूरामचंद्रांच्या पादुका ठेऊन राज्याचा कारभार सांभाळला होता. त्यामुळेच अयोध्येला जाताना किमान या गोष्टीची जाण राहूद्या.  अशी कडक शब्दात संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून त्यांना या दौऱ्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News