अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या संघाचे दैदीप्यमान यश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या आयकेएसएफ संघाने स्पर्धेत सहभाग घेतला. संघाने उल्लेखनीय काम करत 22 सुवर्णपदके, 8 रौप्यपदके आणि 5 कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अंधेरी येथे मुंबई महानगरपालिका आणि थांगता असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने 'महापौर थांगता  चॅम्पियन्शिप 2020' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी गोदीवली बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेच्या क्रिडांगणामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या 35 स्पर्धकांनी दैदीप्यमान यश संपादन केले. 700 पेक्षा अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यावेळी नामांकीत प्रशिक्षक, विविध संघ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

अनेक सामाजिक उपक्रम राबविणारी अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्था उल्लेखनीय कामागिरीसाठी ओळखली जाते. अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या आयकेएसएफ संघाने स्पर्धेत सहभाग घेतला. संघाने उल्लेखनीय काम करत 22 सुवर्णपदके, 8 रौप्यपदके आणि 5 कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तराचे ग्रँडमास्टर डॉ. हनशी प्रदिप मोहिते, ग्रँडमास्टर केवोशी, आयकेएसएफची संचालिका सौ. अनिता मोहिते, एसइएनएसएआयते प्रशांत विशाल सिंग, मीना थापा, अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा सुनीता सचिन नागरे, थांगता असोसिएशनचे संतोष खंदारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  

पालकांना वाटते की, आपल्या मुलाने खुप अभ्यास करावा आणि शाळेत प्रथम क्रमांक मिळवावा. प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी पालक आपल्या मुलांकडून अधिक अभ्यास करुन घेतात. अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना खेळ खेळण्यासाठी वेळ मिळत नाही. मग खेळाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये न्युनगंड निर्माण होत आहे. न्युनगंडातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची खेळ महत्त्वाची भुमिका बजावतो. खेळातून मुलांमध्ये आत्मविश्वाची निर्मिती होते. पारितोषिके जिंकलेल्या स्पर्धकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ओसंडून वाहत होता.
-
सौ. सुनीता सचिन नागरे, अध्यक्षा, अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्था , अंधेरी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News