चकचकीत मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजेच २६ जुलै २००५

निवृत्ती बाबर
Friday, 26 July 2019

पर्यटन क्षेत्र, गरिबांची मुंबई, आर्थिक राजधानी मुंबई, चंदेरी दुनियेची मुंबई, क्रिकेट जगताची पंढरी अशी काहीशी ओळख असणारी आपली मुंबई.

पर्यटन क्षेत्र, गरिबांची मुंबई, आर्थिक राजधानी मुंबई, चंदेरी दुनियेची मुंबई, क्रिकेट जगताची पंढरी अशी काहीशी ओळख असणारी आपली मुंबई. गेल्या काही वर्षांपासून दहशदवादी हल्ले, दंगली, पूर, आपत्कालीन दुर्घटना, धोकादायक शहर अशा प्रकारे मुंबईची ओळख बनू लागली आहे. प्रत्येक घटनेचा आयुष्यावर कमी-अधिक, बरा-वाईट परिणाम होतच असतो; पण घटनेने आयुष्याची दिशाच बदलते आणि २६ जुलैनेही मुंबईची दिशा बदलली.

मुंबईसह महाराष्ट्राचा काळा दिवस २६ जुलै २००५ या दिवशी मुंबईमध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. तब्बल २४ तासांमध्ये ९४४ मीमी पावसाची नोंद झाली होती. १०० वर्षाच्या इतिहासामध्ये ही सर्वाधिक नोंद होती. ज्यांनी २६ जुलै अनुभवला त्यांच्या आयुष्यातील ते तीन दिवस व त्याचे दूरगामी परिणाम विसरुच शकणार नाहीत. 

निसर्गाच्या तांडवाचा मुंबईकरांवर जबरदस्त परिणाम झाला आणि तो प्रत्येक क्षेत्रात दिसला. प्रत्येक गोष्टीतून आपण काहीतरी शिकवण घेत असतो. पावसाळा तर नेहमीच येत असतो. त्यासोबत समस्याही ओढावून येतात. या समस्यांच्या निवारण्यासाठी महानगर पालिका अजूनही कमी पडते.

...तर महानगर पालिका कुठे कमी पडते
नाले सफाई वेळेवर केली जात नाही.
महानगर पालिकेसह राज्यसरकारचेही दुर्लक्ष होत असते.
मुंबईतील पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा जुनी असून तिचे आधुनिकीकरण अद्याप झालेले नाही.
मुसळधार पावसाची पूर्वसूचना दिली जाते, परंतु ती सपशेल खोटी ठरते व नागरिक जागरूक नसतात.
मिठी नदी आणि इतर नाल्यांमधील गाळ पूर्णपणे काढला जात नाही.
काळ्या यादीत समावेश असलेल्या आणि भ्रष्ट कंत्राटदारांनाच पुन्हा-पुन्हा कामे दिली जातात.
प्रत्येक कंत्राट मंजूर करताना भ्रष्टाचार होतो.
पालिका प्रशासनाकडून संपूर्ण निधी खर्च केला जात नाही.
आपल्या मुंबईला या सर्व धोक्यांपासून वाचवण्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेसह राज्यसरकारची आहे. जर पुन्हा एकदा २६ जुलै मुंबईकरांना अनुभवायचा नसेल, तर पालिकेसह मुंबईकरांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे, तसेच सतर्क आणि जागरूक राहिले पाहिजे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News