नुकतेच काही वर्षांपूर्वी बांधलेले किंबहूना अजूनही बांधकाम चालू असलेले मुंबईतील हे सर्वात नवखं आकर्षण आहे. याचे नावच असे आहे. बाहेरुन जरी हे मंदिर वाटत असलं तरी हे मंदिर नसून एक विपश्यना केंद्र आहे.

येथे ध्यान धारणा शिकवली जाते, अर्थात आर्ट ऒफ लिव्हींग शिकवले जाते.फार वेगळ्य़ा पध्दतीने बांधण्यात आलेली ही वास्तू आहे, व मुंबईतील आठवे आश्चर्य म्हणून नावारुपास येत आहे. हे घुमटाकार असून ह्याची उंची आणि व्यास ३२५ फ़ूट आहे. येथे ८००० लोक एका वेळी बसून ध्यान करु शकतात.

म्यानमार येथील विपश्यना केंद्राकडून याचे दरवाजे तर थायलंड येथील केंद्राकडून याचा सोनेरी रंग देणगीदाखल देण्यात आला आहे. घुमटाच्या शिखरावर १ कोटी रुपयांचा क्रिस्ट्लस्टोन बसवण्यात आला आहे व त्याच्या खाली सोन्याच्या ८ रींग्स बसवण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर हे सर्व बांधकाम भूकंप निरोधक आहे.

ह्या पगोडाचा घुमट हा जगातील सर्वात मोठा घुमट आहे, आणि पुढिल २००० वर्षे तरी या घुमटाला काहीही होणार नाही इतकं भक्कम बांधकाम करण्यात आले आहे.

मनशांती आणि आत्मिक समाधानासाठी आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी भेट द्यायलाच हवी.येथे येण्यासाठी बोरीवली स्थानकापासून बस व रिक्षाची सोय उपलब्ध आहे तसेच समुद्र मार्गे बोटीने देखील येथे जाता येते.