अखेर रोहितच्या ‘सूर्यवंशी’ची झलक व्हायरल

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Wednesday, 6 March 2019

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर कमालीची कामगिरी केली. या चित्रपटानंतर रोहितच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची घोषणा झाली. खिलाडी अक्षयकुमारची त्याने या चित्रपटासाठी निवड केल्यानंतर चित्रपटाच्या  फर्स्ट लूककडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं.

अखेरीस चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित केला आहे. पोलिसाच्या वेशातील अक्षयचा लूक सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड होतोय. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

तसेच रणवीर सिंग, अजय देवगण चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून झळकणार आहेत. अक्षय सध्या त्याच्या आगामी ‘केसरी’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. ‘केसरी’चं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरच तो ‘सूर्यवंशी’च्या तयारीला सुरुवात करणार आहे. एकूणच काय; तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा रोहितच्या ॲक्‍शनपट चित्रपटाचा थरार पाहायला मिळणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News