तरुणींना सक्षम बनवण्याची गरज

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

 ‘‘राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे दोन छत्रपती घडविले. जिजाऊंच्या जन्मानंतर लखोजीराव जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटली. जिजाऊंचे लाड पुरवले नाही, तर त्यांना तलवार चालवायला शिकवली

भोसरी :  ‘‘राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे दोन छत्रपती घडविले. जिजाऊंच्या जन्मानंतर लखोजीराव जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटली. जिजाऊंचे लाड पुरवले नाही, तर त्यांना तलवार चालवायला शिकवली. आज मुलींच्या वडिलांनी स्वतःचे संरक्षण करण्याचे शिक्षण मुलींना द्यायला पाहिजे,’’ असे मत शिव व्याख्याते अमोल मिटकरी यांनी भोसरीत व्यक्त केले.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि भोजापूर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयद्वारे आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी माजी आमदार विलास लांडे, महापौर उषा ढोरे, नगरसेवक अजित गव्हाणे, माजी महापौर मोहिनी लांडे, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हणे, उत्तम अल्हाट, धनंजय भालेकर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उपप्राचार्य दादासाहेब पवार, कॅम्पस डायरेक्‍टर प्रा. किरण चौधरी, अश्विनी भोसले आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनील थिगळे यांनी केले. सुहास गटकळ यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News