मुलींना या स्वभावाची मुले आवडतात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 April 2019

प्रत्येकाची एक वेगवेगळी पसंत असते मात्र अशा काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक मुलामध्ये असाव्यात अशी मुलींची इच्छा असते. मुलींना कशी मुले आवडतात याचे उत्तर एक असू शकत नाही. मात्र साधारणपणे मुलींना सन्मान करणारे, मनमिळावू, आणि संस्कारी मुले आवडतात. याशिवाय स्वच्छतेची आवड असलेले तसेच आनंदी मुलेही मुलींना आवडतात. जर तुम्हीही स्मार्ट असाल त्यानंतरही मुली तुमच्याकडे लक्ष देत नाहीत तर तुमच्या वागणुकीत बदल करा. 

तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय की मुलींना मुलांच्या कोणत्या गोष्टी आवडतात? मुलांच्या कोणत्या गोष्टी मुलींना लगेच इंप्रेस करतात..

सरळ आणि साधा
जेंटलमेन तरुणांकडे अधिकतर मुली आकर्षित होतात. जी मुले सरळ आणि साध्या स्वभावाची असतात अशा मुलांकडे मुली सहज आकर्षित होतात. मुलांचा प्रामाणिकपणा मुलींना भावतो. तसेच जी मुले अधिक संवेदनशील असतात अशी मुलेही मुलींना आवडतात.

आत्मविश्वास
साहसी मुले तरूण मुलींना अधिक आकर्षित करतात. तसेच त्यांचा आत्मविश्वासही मुलींना भावतो. मुलींना लाजाळू तसेच संकोची मुले आवडत नाहीत. जी मुले खुलेपणाने बोलतात त्या मुलांच्या प्रेमात मुली लगेत पडतात. 

गंभीर स्वभाव आणि सन्मान
मुलींना गंभीर स्वभावाची मुलेही खूप आवडतात. मुलींच्या मागे लागणारी मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत. जी मुले महिलांचा सन्मान करतात अशी मुले मुलींना फार आवडतात. तसेच एखादी समस्या असेल तर ते सोडवण्याऐवजी बोल लावणारी मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत.

केअरिंग स्वभाव
मुलींची काळजी घेणारी मुले तरुणींना अधिक आवडतात. मुलींना वाटते आपल्या जोडीदाराने नेहमी आपली काळजी घ्यावी. मुलांचा केअरिंग स्वभाव मुलींना भावतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News