मुलींनो आईला गिफ्ट नको; पण हे नक्की करा...

निवृत्ती बाबर, यिनबझ
Sunday, 12 May 2019

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते. जगभरात मे महिन्याच्या दुसरा रविवार हा 'मातृ दिवस' म्हणून साजरा केला जातो. आज इंटरनेटच्या माध्यमातून आई-मुलाचं नातं शास्वत दृढ राहावं यासाठी आईचा फोटो स्टेटस ठेवून, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शुभेच्छा देऊन आपले आई वरचे प्रेम दाखवत आहेत. काही जण केक कापून आपल्या आईला आवडतं गिफ्ट देऊन आईला खुश करण्याचा प्रयत्न करतात. आपली आई कोणत्याही आपल्या मुलगा किंवा मुलगी यांच्याकडून गिफ्टची अपेक्षा ठेवत नाही. फक्त आपला मुलगा आयुष्यभर सोबत राहावा व मुलगी तिच्या सासरी जाईपर्यंत तरी सोबत राहावी अशी इच्छा असते.

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते. जगभरात मे महिन्याच्या दुसरा रविवार हा 'मातृ दिवस' म्हणून साजरा केला जातो. आज इंटरनेटच्या माध्यमातून आई-मुलाचं नातं शास्वत दृढ राहावं यासाठी आईचा फोटो स्टेटस ठेवून, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शुभेच्छा देऊन आपले आई वरचे प्रेम दाखवत आहेत. काही जण केक कापून आपल्या आईला आवडतं गिफ्ट देऊन आईला खुश करण्याचा प्रयत्न करतात. आपली आई कोणत्याही आपल्या मुलगा किंवा मुलगी यांच्याकडून गिफ्टची अपेक्षा ठेवत नाही. फक्त आपला मुलगा आयुष्यभर सोबत राहावा व मुलगी तिच्या सासरी जाईपर्यंत तरी सोबत राहावी अशी इच्छा असते. परंतू २१ व्या शतकातील मूल व मुली या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. 

आईचे प्रेम हे दोन्ही मुलांवर समान असते. पण मुलीला केव्हा तरी वाटतं, आईच आपल्यावर प्रेम करत नाही. असं प्रत्येक्षात काहीही नसतं, आई ही मुलांमध्ये केव्हाही दुजाभाव करत नाही. मुलग्याला घराचा वंशाचा दिवा मानला जातो तर मुलगीला दोन्ही घराण्याची ज्योत मानली जाते. परंतू आताच्या मुली याकडे दुर्लक्ष करत आहेत. 

सहाजिकच मुलगा किंवा मुलगी वयात आली की आईचं लक्ष त्यांच्यावर असतं. मुलांपेक्षा मुलींवर आईची माया ही नेहमीच जास्त असते, मात्र मुलींकडून याचा दुसरा अर्थ काढला जातो. 

मुलं-मुली आपल्या आई वडीलांचे लक्ष दुर्लक्षित करून प्रेम संबंधात पडतात. त्याचा त्रास जास्तकरून मुलींना सहन करावा लागतो. तो मुलगा व मुलगी लग्न करण्याचा निर्णय घेतात व घरी सांगतात, पण घरून विरोध असेल तर त्यांना सर्व गोष्टी अवघड होतात. त्यामुळे ते दोघेही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय या दोघांच्या आयुष्यातील कलाटणी देण्याचा निर्णय जरी असला, तरी त्यामुळे दोघांच्या घरच्यांची समाजामध्ये असलेल्या किंमत टाच येते. याचा परिणाम जास्तकरून मुलींच्या घरच्यांना सहन करावा लागतो. 

त्यामुळे मुलींनो या वर्षीच्या मदर्स डे निमित्त आईला वेगळे गिफ्ट देण्यापेक्षा आईला आयुष्यभर लक्षात राहील अशी भेटवस्तू द्या, ती म्हणजे आयुष्यभर समाजात तुमचा असणाऱ्या मान-सन्मानाला धक्का लागणार नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News