प्रियकर पैसे कमवणारी मशीन नाही... मुलांनो प्रेयसीला थोडक्यात सांभाळा...

सायली कदम (यिनबझ)
Friday, 10 May 2019

मुलं-मुली प्रेम करतात... त्यांना त्याचा संपूर्ण अधिकार आहे... पण हेही तितकच महत्वाचं आहे, की त्या प्रेम करण्यामागे कोणतीही आपेक्षा नसावी, कोणताही स्वार्थ नसावा... आशाच नात्यातील आपेक्षा आणि मुलींकडून मुलांसाठी ठेवण्यात आलेल्या कंडिशन्स समोर ठेवून मुलांची बाजू मांडण्याचा हा थोडासा प्रयत्न..

मुलींनो लग्न करताना...

मुलगा नोकरीला आहे का?
हजारो रुपये पगार आहे का?
राहायला फ्लॅट आहे का?
कार आहे का?
बँक बॅलन्स किती आहे?
मुलगा एकुलता एक आहे का?

या सर्रास गोष्टी विचारतात; पण त्या कधी हा विचार का करत नाहीत की स्वतःचे वडील २०-२५ वर्ष या शहरात राहूनदेखील घर खरेदी करू शकले नाहीत, कधी रिक्षाने स्टेशनला गेले नाही, अजून भाड्याच्या खोलीत राहतात. मग हा काल आलेला किंवा नुकताच नोकरीला लागलेला मुलगा एवढ्या सगळ्या अपेक्षा कशा पूर्ण करू शकतो..?
नाही ना करू शकत...!

स्वतः कधी वडापाववर खर्च केला नाही आणि मुलाकडून बर्गरची अपेक्षा मुलींनी का ठेवावी? खरंच सुखी संसार मिळवायचा असेल तर मुलगा कसा आहे हे गरजेचे नाही, तर जे मिळतंय ते; पण गमवायची वेळ येते. कितीही बरी परिस्थिती असली मुलाची तरी मुलीला ते कमी लायकीचे वाटते आणि उगाच आपल्या सासरला कमी लेखात. 

खरंच ज्याच्याशी लग्न करायचं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्याच्या चांगल्या वाईटात त्याला साथ द्या. तो नुसते पैसे कमवण्याची मशीन नाही, की सतत तुमच्याबरोबर फिरण्यासाठी अंबानीचा पोरगा नाही; पण एक नक्की की खरच एक दिवस तो त्याच्या स्वतःच्या हिंमतीवर कमीत कमी तुमच्या ७५% तरी अपेक्षा नक्की पूर्ण करेल.

तुम्ही पण खुश राहाल आणि तो पण... उगाच अतिअपेक्षा करणं चुकीचच.. 
या गोष्टीचा काही मुलींना राग येईल... पण यातील काही बाबी नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत. अति हव्यास झाला की हातात जे आहे ते निसटून जाते! हे लक्षात घ्या!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News