विवाह इच्छुक युवतींची शेतकऱ्यांना नापसंती !

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Tuesday, 3 March 2020

करंजी : ग्रामीण युवतींना सुद्धा शेतकऱ्यांचा मुलांसोबत लग्न करण्यापेक्षा, ज्यांच्या कुटुंबात शेती नाही. त्याला सरकारी किंवा कंपनीत नोकरी आहे. अशाच मुलाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. 

करंजी : ग्रामीण युवतींना सुद्धा शेतकऱ्यांचा मुलांसोबत लग्न करण्यापेक्षा, ज्यांच्या कुटुंबात शेती नाही. त्याला सरकारी किंवा कंपनीत नोकरी आहे. अशाच मुलाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. 

विवाहाची वयोमर्यादा वाढू नये म्हणून मुलगा असो वा मुलगी वर-वधू या दोन्ही पक्षाकडील कुटुंब विवाह सोहळ्याच्या तयारीत असतात. मात्र, शिक्षण व नोकरी हा दुहेरी लाभ देणाराच वर आपल्या मुलीला मिळावा, अशी अपेक्षा युवती व तसेच तिच्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे. बेरोजगारी वाढल्या आहेत. पदवीधर मुलेही आता शेती कसण्यापेक्षा पुणे, सुरत, गुजरात, औरंगाबाद, जळगाव, किराणा दुकानावर, कपड्‌यांचा दुकानावर, नाशिक येथे जाऊन काम करणे पसंत करतात. मात्र, असे असले तरी काही युवक शेती करून दामदुप्पट उत्पन्न काढत आहेत. मात्र, सरकारी नाही तर खासगी कंपनीत नोकरीवर असणाराच नवरा शोधण्याकडे कल दिसून येत आहे. ग्रामीण भागातील तरुण मुले शिक्षित मुलींचा विचार ऐकावयास येतो. 

आजही माता पित्याच्या पसंती नुसार निवडलेल्या युवकांनी विवाह करताना मात्र, उच्च शिक्षित व एकाच कार्यालयात नोकरी करणारे युवक, युवती आपल्या प्रेमप्रकरणातून इच्छुक जीवन साथीदार निवडतात. यात जात, पात, धर्म पाहिल्या जात नाही. 

 आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून ते आपल्या संसार टिकवितात ग्रामीण क्षेत्रात युवकांना सरकारी नोकरी मिळणाऱ्याची संख्या नगण्य आहे. अशातच शेती, मोटरसायकल, इलेक्‍ट्रॉनिक दुकान व इतर व्यवसायाचा पर्याय उपलब्ध आहेत. परंपरागत शेती व्यवसाय करणाऱ्या युवकांना रोजगार मिळावा म्हणून आता ग्रामीण भागातील शिक्षित युवकही महानगराच्या दिशेने जात आहेत. अशातच नोकरी नसलेला पण उच्च शिक्षित असूनही शेतीच्या माध्यमातून लाखोचे उत्पन्न मिळविण्यासाठी काढणाऱ्या युवकांना विवाह जुळविण्यात अडचणी निर्माण होत आहे. 
ग्रामीण युवतींना सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न करण्यापेक्षा ज्यांच्या कुटुंबात शेती नाही. पण त्याला सरकारी किंवा कंपनीत नोकरी असेल अशाच वरांना पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News