याच्या गर्लफ्रेंडने जिंकवलं, त्याच्या गर्लफ्रेंडने हरवलं?

रसिका जाधव (यिनबझ)
Thursday, 11 April 2019

सध्या देशात कोणत्या गोष्टीचे श्रेय कोणाला दिले जाईल, हे सांगता येत नाही. अशा या श्रेयवादाच्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याच्या प्रयत्न करत आहोत.

सध्या देशात कोणत्या गोष्टीचे श्रेय कोणाला दिले जाईल, हे सांगता येत नाही. अशा या श्रेयवादाच्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याच्या प्रयत्न करत आहोत.

काही दिवसांपूर्वीचं युपीएससीचा निकाल जाहीर झाला आणि त्या परिक्षेतून देशात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याने म्हणजेच कनिष्क कटारियाने आपल्या यशाचे श्रेय ज्याप्रकारे आई-वडिलांना दिले त्याप्रकारेच त्याचे श्रेय आपल्या गर्लफ्रेंडलाही दिले.

कनिष्क कटारियाची गर्लफ्रेंड त्याला समजून घेत होती. त्याला लागेल ती मदत करत होती. तिने त्याच्या अभ्यासात कधी व्यत्यय आणला नाही, त्याउलट जेव्हढी मदत करता येईल, तेव्हढी मदत तिने केली. प्रत्येक अडी अडचणींना ती त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत होती. 

त्यामुळे कनिष्क आपल्या सर्व मेहनतीचे फळ आपल्या गर्लफ्रेंडलाही देतो.

त्याउलट विचार केल्यास आम्ही विराट कोहलीवर अभ्यास केला. विराट हा क्रिकेट क्षेत्रातला देव जरी नसला तरी क्रिकेट क्षेत्रातला सर्वात सर्वोत्तम खेळाडू होतो आणि आहे देखील. कित्येक तरुण त्याचा फॅन आहेत, तर कित्येक तरुणींच्या हृदयाची तो दिल की धडकन आहे.

 

 

आपल्या खेळाने क्रिकेट जगतातल्या अनेकांची मने त्याने जिंकली आहेत. पण दुसरीकडे असेही म्हटले जाते की, विराटच्या आयुष्यात अनुष्का आल्यापासून त्याच्या खेळावर मोठ्याप्रमाणात परिणाम झाल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे अख्खी तरुणाई त्याच्या प्रेमात पडजली होती, त्याचप्रमाणे अनुष्का देखील त्याच्या प्रेमात पडली होती.

अनुष्का ज्या-ज्या वेळेस मैदानावर क्रिकेट बघायला जाते, त्या-त्या वेळेस विराटने ज्या मॅचेस खेळला आहे, त्यातील काही मॅचेसमध्ये लवकर बाद झाला आहे. त्याचे लग्न झाल्यानंतरही त्याचा खास परफॉरमन्स दिसून आला नाही.

पूर्वी पासून आपण एकत आलो आहे की, प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते, पण ते प्रत्येकाच्या नशिबात असतेच असे नाही. त्यामुळे आजच्या स्टोरीचे शिर्षक असे मानायला हरकत नाही की, याच्या गर्लफ्रेंडने जिंकवलं, त्याच्या गर्लफ्रेंडने हरवलं?

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News