भाड्याने जोडीदार कसे मिळवाल?

महॆश घोलप
Monday, 28 January 2019

मुंबई : प्रत्येकाला एका जोडीदाराची गरज असते, तसेच जोडीदाराला आपलसं करण्यासाठी  प्रत्येकजण वेगवेगळी शक्कल लढवत असतो. याचं समस्येने ग्रस्त असलेल्या  कौशल प्रकाश या तरूणाने गर्लफ्रेंड भाड्याने मिळणारे 'RABF' हे मोबाईल अॅप तयार करून तरूणांच्या समस्येचे निराकरण केले आहे.  

मुंबई : प्रत्येकाला एका जोडीदाराची गरज असते, तसेच जोडीदाराला आपलसं करण्यासाठी  प्रत्येकजण वेगवेगळी शक्कल लढवत असतो. याचं समस्येने ग्रस्त असलेल्या  कौशल प्रकाश या तरूणाने गर्लफ्रेंड भाड्याने मिळणारे 'RABF' हे मोबाईल अॅप तयार करून तरूणांच्या समस्येचे निराकरण केले आहे.  
१५ ऑगस्टला कौशल प्रकाश नावाच्या एका तरूणाने हे अॅप लॉन्च केलं. कैशल प्रकाश स्वतः 3 वर्ष डिप्रेशनमध्ये होता. त्यातून बाहेर आल्यानंतर त्याच्या डोक्यात त्याच्या कल्पनेने उदय घेतला. एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन उपचार करण्यापेक्षा आपण आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीकडे आपलं मन मोकळं केलं किंवा आपल्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगितल्या तर त्यामुळे नैराश्य कमी होण्यास नक्की मदत होईल असं त्याला वाटल्याने त्याने हे अॅप लॉन्च केलं.
या अॅपमध्ये रजिस्टर करण्यासाठी तुमचं वय हे २२ ते २५ वयोगटातील असणं गरजेचं आहे. तसेच या अॅपद्वारे तुम्हाला भाड्याने बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड घेण्यासाठी पैसे भरण्याची गरज आहे. जर तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तिची निवड केली तर तुम्ही साधारणतः ३०० ते ५०० रूपयांपर्यंत भाडे भरावे लागणार आहे. तेच जर तुम्ही सेलिब्रिटींची निवड केलीत तर त्यासाठी तुम्हाला ३००० रूपये भरावे लागणार आहेत. जर तुम्ही मॉडेलची निवड केलीत तर मात्र तुम्हाला प्रत्येक तासाचे २००० रूपये भरावे लागतील आणि त्या व्यक्तीला भेटल्यानंतर दोघांच्या फिरण्याचा आणि खाण्याचा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे. 
तुम्ही १०वी किंवा १२पास असाल तर सहज या अॅपमध्ये  बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड म्हणून रजिस्टर करू शकता. भाड्याने  बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड घेण्याची संकल्पना आपल्या देशात नवीन असली तरी ती जगभरात सर्रास वापरण्यात येते. या अॅपमध्ये रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ६ मुलांचा किंवा मुलींचा पर्याय देण्यात येतो. त्यातील एकाची तुम्ही निवड करू शकता. सध्या ही सुविधा केवळ मुंबई आणि पुण्यात सुरु करण्यात आली असून येत्या काळात इतर शहरांतही त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. पाश्च्यात्य संस्कृतीच्या पायावर उभी राहिलेली ही संकल्पना कितपत यशस्वी ठरतेय, तसेच या संकल्पनेला तरूणाई कोणत्या दृष्टीकोनातून स्विकारेल हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News