पेट्रोल पंपावर काम करणाऱ्याच्या मुलीनं मिळवले ९७ टक्के गुण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020
  • काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला.
  • दहावीच्या निकालात ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • २४२ विद्यार्थ्यांना मिळाले १०० टक्के गुण आणि यंदाही मुलीनींच बाजी मारली आहे.

दौंड :-  काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या निकालात ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २४२ विद्यार्थ्यांना मिळाले १०० टक्के गुण आणि यंदाही मुलीनींच बाजी मारली आहे. यामध्ये कुरकुंभ येथील फिरंगाईमाता विद्यालयातील साक्षी शिंदे हिने दहावीच्या परीक्षेत ९७.०० टक्के मिळवून विद्यालयात पहिली आली आहे. या विद्यार्थांनी दाखवून दिले की, यश मिळविण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाची गरज असते. साक्षीचे वडील कुरकुंभ येथील पेट्रोल पंपावर काम करतात तर आई अंगणवाडीमध्ये काम करते.

साक्षीची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काम केले तरच घरचा उदरनिर्वाह चालतो. कुरकुंभ येथील घर सोडले तर काहीच मालमत्ता नाही. साक्षीची घरची परिस्थिती बेताची असल्याने ती शाळेतून घरी गेल्यावर आईला घर कामात मदत करत असे. दोन्ही मुलीच असल्याने मुलाची उणीव साक्षीनं कधीही आई वडिलांना भासू दिली नाही. मुलगी ही घराचे नावलौकीक करू शकते, हे तिने दाखवून दिले आहे. हलाखीच्या परिस्थितीत दहावीत ९७.००  टक्के मिळवीत विद्यालयाचे आणि गावाचे नावलौकिक केले आहे.

परिस्थितीशी सामना करीत चांगली गुणवत्ता समजापुढे ठेवणाऱ्या या विद्यार्थिनीचे गावकऱ्यांकडूनही कौतुक होत आहे. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल उत्कर्ष शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवराव शितोळे, कार्याध्यक्ष अनिल शितोळे,सचिव सचिन शितोळे, प्राचार्य नानासाहेब भापकर, कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले, पोलीस पाटील रेश्मा शितोळे, ग्रामसेवक विनोद शितोळे, पर्यवेक्षक सिकंदर शेख, संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक वृंद ग्रामस्थ यांच्याकडून साक्षीचे कौतुक होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News