त्याच्या डोळ्यादेखत प्रेयसीचं लग्न झालं...

अभिनव ब. बसवर
Monday, 3 June 2019

नातेवाईकांमध्ये ज्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या त्यांची थाटात लग्ने पार पडली. मुलाची पोस्ट जितकी मोठी तितका जास्त हुंडा आणि तेवढंच मुलीच्या अंगावर सोनं घातलं जायचं. सिटीमध्ये फ्लॅट आहे एवढं बघूनच काही लोकांनी मुली दिल्या. संसार सुरू झाले.

नातेवाईकांमध्ये ज्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या त्यांची थाटात लग्ने पार पडली. मुलाची पोस्ट जितकी मोठी तितका जास्त हुंडा आणि तेवढंच मुलीच्या अंगावर सोनं घातलं जायचं. सिटीमध्ये फ्लॅट आहे एवढं बघूनच काही लोकांनी मुली दिल्या. संसार सुरू झाले. काहींच्या टेम्पररी नोकऱ्या लग्नानंतर गेल्या तेव्हा माहेरच्यांनी मुलीच्या तोंडाकडे बघून जावयाला एखादा धंदा टाकण्यासाठी पैशाची मदत केली.

त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या प्रेयसीचं लग्न झालं, एम टेक जावई मिळाला म्हणून तिच्या वडिलाने आख्या गावात लग्नाचा धुरळा उडवला. दोन वर्षात तिला मुलबाळ देखील झालं.

त्याने सुरू केलेला भाजी डिलिव्हरीचा बिजीनेस हळू हळू जोर धरू लागला. एकाचे दोन टेम्पो झाले. त्याने दोन ट्रॅव्हलर्स खरेदी करून भाड्याने लावल्या. राजकीय लोकांमध्ये ओळखी वाढल्या, मोठ्या लोकांत उठबस सुरू झाली. त्याने चालू केलेल्या नाष्टा सेंटरच्या उद्घाटनाला स्थानिक आमदार,पदाधिकारी सगळ्यांनी हजेरी लावलेली. अचानक अनेक मुलींची स्थळे त्याला येऊ लागली. मुलीचं ग्रॅज्युएशन होण्याआधीच आईबाप तिचे फोटो त्याला दाखवू लागले.नातेवाईक आईवडिलांचं कौतुक करू लागले. काळ बदललेला.

पण माणूस म्हणून तो पुर्वीचाच होता. त्याच्या डोळ्यादेखत त्याची प्रेयसी लग्नमंडपात आनंदात गेली हे त्याने अनुभवलेलं. त्याने मिळवलेल्या वैभवाला या सगळ्या माश्या चिकटल्यात हे त्याच्या लक्षात आलं. आज वैभव आहे तोपर्यंत हे घोंगावणार. उद्या लयाला गेलं तर तोंड फिरवणार. त्याने सगळी स्थळे नाकारली आणि एका अनाथ मुलीशी लग्न केलं. संसार सुखाने सुरू झाला आणि दोघांच्या कष्टाने दिवसेंदिवस वैभव वाढत गेलं...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News