तरुणांनो, आपल्या खास व्यक्तीला त्यांच्या राशीनुसार द्या गिफ्ट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 21 September 2019

कधी-कधी मदतीचा हात आपल्याकडे येतो, कधी हीच मैत्री आपले कान धरून योग्य वाटेवर आणून सोडते.

आजकाल जगात वावरताना मोठ्या गोष्टी जश्या झपाट्याने बदलतात तसे काही बदल हे आपल्या जीवनात आपल्या बरोबरच्या असलेल्या चांगल्या नात्यात होतात.  ह्यात काही चांगले बदल होतात. आजकाल नाती जपण्याच्या पद्धती सुद्धा बदलत असतात. विशेषतः मैत्री च्या नात्यातील  झपाट्याने झालेले  बदल आपल्याला दिसून येतात. मैत्री हे आयुष्यातील एक असं नात आहे ज्यात आपण आपले सुख दुःख एकमेकांना वाटू शकतो. 

कधी-कधी मदतीचा हात आपल्या कडे येतो त कधी हीच मैत्री आपले कान धरून योग्य वाटेवर आणून सोडते. आपल्या अश्या काही खास मैत्रीला एक वेगळे गिफ्ट देऊन आपल्या मित्राजवळ आपली एक  आठवण आपण देऊ शकतो.यासाठी आता एक नवीन युक्ती तयार करण्यात आली आहे. ती म्हणजे आपल्या मित्राच्या राशी नुसार त्याला गिफ्ट देणे. ह्यात आपण आपल्या जवळच्या काही खास मित्राची जी काही रास आहे त्यानुसार ते गिफ्ट आपण त्याला देऊ शकतो.यासाठी खालील प्रमाणे असलेल्या १२ राशींनुसार गिफ्ट सांगितले आहे. 

  • मेष : लाल रंग, मोबाइल गिफ्ट करु शकता.
  • वृषभ : ब्राइट रंगाचा फ्रेंडशिप बेल्ट किंवा परफ्यूम
  • मिथुन : हिरव्या रंगाचा ड्रेस किंवा बुक्स
  • कर्क : पांढर्‍या रंगाचा फ्रेंडशिप बँड किंवा एक्वेरियम
  • सिंह : नारंगी रंगाची वस्तू
  • कन्या : ब्राउन रंगाचा फ्रेंडशिप बँड, पर्स किंवा स्टाइलिश वॉच
  • तूळ: चांदीची वस्तू
  • वृश्चिक : रेड टी शर्ट, रेड गॉगल्स एवियेटर
  • धनु : शक्य असल्या सोन्याची वस्तू किंवा पिवळा रंगाच्या वस्तू
  • मकर : निळ्या आणि काळ्या रंगाची वस्तू
  • कुंभ : निळ्या, आकाशी किंवा गुलाबी रंगाची वस्तू किंवा फेब्रिक
  • मीन : मँगो यलो किंवा एक्वा ब्लू रंगाची वस्तू

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News