घरच्यांचे असे टोमणे,  जे सिंगल लोक ऐकून ऐकून हैरान झाले.... 

यिनबझ टीम
Thursday, 5 March 2020

तुम्ही सिंगल आहात? मग घरच्यांचे हे टोमणे एकुण कंटाळला असाल, पण काय करणार, तुम्हीही कितीही करिअरच्या मागे लागत असाल, तरी घरच्यांना वाटणार की तुमचं बाहेर काहीतीर चालुच आहे...

असं म्हणतात की लग्नाचे लाडू ज्यांनी खाल्ले ते नाराज झाले आणि ज्यांनी नाही खाल्ले ते देखील नाराज झाले. असो आपण याकडे थोडं दुर्लक्ष करू आणि पुढे जाऊ... तुम्ही जर सिंगल असाल आणि तुम्ही चांगली नोकरी करत असाल, तर तुम्हाला घरच्यांच्या अनेक टोमण्यांना सामोरे जावे लागते. आता हे टोमणे कोणते असतील, तर ते आपण पाहू.

आता तुला नोकरी लागली आहे, आता तरी लग्न कर...
सगळ्यात जास्त मुलांसाठी हा टोमणा लागू होत असतो, घरच्यांचं एकच म्हणणं असते, की मुलाला नोकरी लागली की त्याने लवकर लग्न करावं आणि सेट व्हावं. मात्र नोकरीला लागल्यानंतर तरुणांना तसेच तरुणींना अनेक करिअरच्या संधी मिळत  असतात आणि त्यांना त्या मिळवायच्या असतात.

तु लग्नाचा विचार करत नाही, कोणी बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड तर नाही ना?
नातेवाईकांच्या मते एखादा मुलगा किंवा मुलगी जर लग्नासाठी घरच्यांना  नकार देत असेल, तर घरचे मात्र त्यांच्यावर संशय घेत असतात, घरच्यांच्या मते संबंधीत तरुण अथवा तरुणीचं बाहेर काहीतरी प्रेम प्रकरण असेल म्हणून लग्नासाठी ते नाही म्हणत आहेत. तुम्ही घरच्यांना पन्नासवेळा समजून सांगा की आपलं बाहेर काहीच प्रेमप्रकरण सुरू नाही, मात्र घरचे त्यावर विश्वास ठेवत नाहीत.

जीवनात एकटा राहुन कसं चालेल
जीवनात सोबत कोणतरी असणे आवश्यक आहे. कोणी एकटाच कसा जगू शकेल? 'आता या घरच्यांनी जास्तकरून आपल्या आई वर्गाने घातलेल्या भावनिक अटीबद्दल तुम्ही काय बोलाल सांगा जरा.

तुझ्या वयात असताना मला दोन मुलं होती...
हे वाक्य जरा आजकाल तरुण तरुणींना कमीच ऐकायला येत असेल, पण या वाक्याचा असर अजून काही कमी झाला नाही. तुझ्या वयात असताना मला दोन मुलं होती, बघ विचार कर आणि लग्न करून घे, नंतर परिवार वाढवताना अडचणी येतील, असं घरच्यांचं ठरलेलं वाक्य काही वर्षांपुर्वी असायचं.

वजन वाढव नाहीतर लग्न कसं होणार / वजन कमी कर नाहीतर लग्न कसं होणार...
हा... आता तुम्हाला पटलं असले की खरच अनेक सिंगल तरुण तरुणींना हा टोमणा चांगलाच लागू होत असेल. हा टोमणा जास्त करून अनेक तरुणींसाठी असतो. वजन कमी कर नाहीतर तुला कोण पसंत करेल...?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News