रुग्णसेवेतून मिळवा ५ हजार रुपये; राज्य सरकारचे नवे धोरण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020

प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून ५ हजार रुपये देण्याचे नवे धोरण आखण्यात आले. त्यामुळे जास्तीजास्त नागरिक प्लाझ्मा दान करतील अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे अनेक राज्यांची आर्थिक घडी विस्कटली, राज्याना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी काही अटी व शर्तीवर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. सध्यातरी कोरोनावर कोणतीही प्रभावशाली लस उपलब्ध नाही. मात्र 'प्लाझ्मा थेरपी' काही प्रमाणात कोरोनवार यशस्वी काम करत आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारने कोरोनातून बऱ्या झालेल्या नागरिकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबत प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून ५ हजार रुपये देण्याचे नवे धोरण आखण्यात आले. त्यामुळे जास्तीजास्त नागरिक प्लाझ्मा दान करतील अशी अपेक्षा कर्नाटक सरकारने व्यक्त केली.

कर्नाटक राज्यातील पंचविस हजार आठशे चाळीस जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील सतरा हजार तीनशे नव्वद नागरिक कोरोनातुन बरे झाले आहे. त्यापैकी चार हजार नऊशे ब्यान्नो रुग्ण बंगळूरु शहरातले आहेत. कोरोनातुन बरे झालेल्या योद्ध्यानी इतरांची सेवा करण्यासाठी प्लाझ्मा दान करावे असे आवाहन कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधारकर यांनी बुधवारी नागरिकांना केले.  

जगभरातील ७० देशात कोरोनावर लस शोधन्याचे संशोधन सुरु आहे. त्यातील अमेरीका, चिन, जापान, रशिया या देशांनी औषध तयार केले आहे, त्याची मानवी चाचणी सुरु आहे. मात्र कोणत्याच देशाला संपुर्ण यश आले नाही. भविष्यात लवरच लस उपलब्ध होईल असा दावा काही देशांनी केला आहे. काही दिवसात लस उपलब्ध झाली तर लाखो रुग्णांचे प्राण वाचणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News