घरबसल्या मिळणार वैद्यकीय मदत; आयआयटीने विकसीत केले अॅप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 April 2020

आयआयटी मुंबईने विकसित केलेली "डब्ल्यूडब्ल्यूएच"ची ही सुविधा ऍप किंवा फोन वापरता येते.

मुंबई  ः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत वैद्यकीय सेवा एका क्‍लिकवर किंवा एक कॉलवर उपलब्ध करण्यासाठी आयआयटी मुंबईने ऑनलाईने प्लॅटफॉर्म विकसित केला. वर्ल्ड वाईड हेल्प (डब्ल्यूडब्ल्यूएच) नामक या प्लॅटफॉर्मवर ज्या व्यक्तीला वैद्यकीय मदतीची गरज आहे, त्याने त्यावरील संपर्क क्रमांकावर फोन करून तसेच आवश्‍यक माहिती भरून ही सेवा मिळवू शकतात. नोंदणी केल्यावर नजीकच्या डॉक्‍टर किंवा मदतनीसाकडून संबंधितांची फोनवरून मदत केली जाते.

आयआयटी मुंबईने विकसित केलेली "डब्ल्यूडब्ल्यूएच"ची ही सुविधा ऍप किंवा फोन वापरता येते. गरजू व्यक्तीकडून त्यावरील फोन क्रमांकावर संपर्क साधून किंवा ऍपमध्ये माहिती भरून मदतीची नोंद केली जाते. त्यानुसार ती मागणी डब्ल्यूडब्ल्यूएच ऍपवर नोंदणीकृत असलेल्या नजीकच्या कनिष्ठ डॉक्‍टरांकडे जाते. प्रसंगी ती पुढे वरिष्ठ डॉक्‍टरांकडे पाठवली जाते. त्यानुसार फोन वरून संबंधित गरजूची मदत केली जाते.

केईएम रुग्णालयात सेवा सुरू होणार

या प्रकारची फोनवरून दिली जाणारी सुविधा कृषिविषयक, आहारविषयक, नोकरीविषयक सल्ला आदींबाबत दोन वर्षापूर्वी सुरु झाली होती. आता त्याचे डिजिटलायझेशन करून सेवा विस्तारण्यासाठी आयआयटी मुंबईच्या एम.टेक विद्यार्थ्यांनी संशोधन केले. त्यानुसार त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूएच ही आरोग्यविषयक सेवा सुरु केली. या प्रकारे "मा ऍण्ड शिशू पोषण" ही नवजात बालक आणि स्तनदा मातांच्या सेवेसाठी ही सुविधा सुरु झाली होती. सध्या आयआयटी मुंबईकडून ही सेवा केईएम रुग्णालयात ही सेवा सुरु करण्यासाठी चर्चा सुरु आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News