'या' क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअरसोबत मिळवा भरघोस पगार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 March 2020
  • सुरुवातीला कोणतही करिअर हे चांगले वेतन वित्त, तंत्रज्ञान, वैद्यकीय, कायदा, बांधकाम क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिकांपुरते मर्यादित होते. मात्र आता वेगाने बदलणारे जग पाहता अनेक क्रिएटिव्ह क्षेत्र करिअरसाठी उपलब्ध झाले आहेत. खरं तर, हे सर्व आपल्या सर्वांसाठी नवी संधी उपलब्ध करून देणारा आहे.

सुरुवातीला कोणतही करिअर हे चांगले वेतन वित्त, तंत्रज्ञान, वैद्यकीय, कायदा, बांधकाम क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिकांपुरते मर्यादित होते. मात्र आता वेगाने बदलणारे जग पाहता अनेक क्रिएटिव्ह क्षेत्र करिअरसाठी उपलब्ध झाले आहेत. खरं तर, हे सर्व आपल्या सर्वांसाठी नवी संधी उपलब्ध करून देणारा आहे. जागतिकीकरणापासून ते ई-लर्निंगच्या बदलांमध्ये सर्जनशीलता आणि मशीन लर्निंग इंडस्ट्रीजमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. त्यामुळे अनके संधी देखील निर्माण झाल्या आहेत. 

हे ट्रेंड लक्षात घेऊन आता विद्यार्थी नोकरीच्या बाजारपेठेतील मागणीनुसार स्वत: ला तयार करत आहेत. 'डिझाईन' हे एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे ज्यात ते स्वत: ला फॅशन डिझाईन, इंटिरियर डिझाइन, ग्राफिक किंवा इंडस्ट्रियल डिझाईन, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, व्हिडिओ एडिटिंग या नवीन वयातील सर्जनशील करिअरसाठी प्रशिक्षण देत आहेत.

या क्षेत्रात उत्तम करिअर सोबत भरघोस पगार मिळण्याचे पर्याय देखील उपलब्ध असतात. यात क्रिएटिव्ह रायटर्स, आर्ट डायरेक्टर, फोटो ग्राफर, व्हिडीओ एडिटर, इंटेरिअर डिझायनर, मल्टीमीडिया डिझायनर, ऍनिमेट, इंडस्ट्रियल डिझायनर अशा विविध क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. संबंधित पर्यायात वेगवेगळे शिक्षण देणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत. त्यासोबतच अनेक ठिकाणी शिक्षण पूर्ण करतेवेळी नोकरीच्या संधी देखील देण्यात येतात. त्यामुळे उत्तम करिअर आणि चांगला पगार मिळवायचा असेल तर या ही क्षेत्रे करिअरसाठी बेस्ट पर्याय ठरू शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News