जिओस्पेशियल तंत्रज्ञानामुळे होईल भारत बलशाली: धारुरकर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • र्यावरण विषयक प्रश्न सोडविण्यासाठी "जिओस्पेशियल' तंत्रज्ञान महत्वपूर्ण ठरणार आहे.
  • कुलगुरु धारुरकर म्हणाले, ""तीस वर्षात जिओस्पेशियल तंत्रज्ञान झपाट्याने विकसित झाले आहे. 
  • नॅशनल रिसोर्सेस डेटा मॅनेजमेंट सिस्टीम उपक्रमांतर्गत हा प्रकल्प मंजूर केला आहे.

औरंगाबाद : भारतातील शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य व पर्यावरण विषयक प्रश्न सोडविण्यासाठी "जिओस्पेशियल' तंत्रज्ञान महत्वपूर्ण ठरणार आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापर केल्यास भारत बलशाली होईल, असे प्रतिपादन त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वि. ल. धारुरकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे "जिओस्पेशियल टेक्‍नोलॉजी'वर सोमवार पासून राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेस सुरवात झाली. डॉ. धारुरकर यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, प्रकल्प संचालक डॉ. के. व्ही. काळे यांची उपस्थिती होती. तीन आठवडे चालणाऱ्या कार्यशाळेत देशभरातून 30 संशोधक यात सहभागी झाले आहेत. 

कुलगुरु धारुरकर म्हणाले, "तीस वर्षात जिओस्पेशियल तंत्रज्ञान झपाट्याने विकसित झाले आहे. भारतासारख्या जैविक विविधता असलेल्या देशात पूर, भूंकप, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागते. अशावेळी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी, संशोधक यांना अद्यावत ज्ञान उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.'' किशोर शितोळे यांनी भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे जगणे सुखकर झाले आहे. दुसरीकडे नैसर्गिक संपत्तीचा होत असलेला ऱ्हास थांबून पर्यावरणाचा समतोल राखावा लागणार असल्याचे सांगितले. 

डॉ. काळे म्हणाले, "विज्ञान व तंत्रज्ञान विभागतर्फे नॅशनल रिसोर्सेस डेटा मॅनेजमेंट सिस्टीम उपक्रमांतर्गत हा प्रकल्प मंजूर केला आहे. याअंतर्गत जिओस्पेशियल टेक्‍नोलॉजी विषयावर क्षमता वृध्दिंगत करणे, कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणे, प्रशिक्षण देणे हे उध्दिष्ट आहे. शेती, पर्यावरण, ऊर्जा, पाणी, दुष्काळ उपायोजना या विषयी प्रशिक्षण देण्यात येईल.''  सूत्रसंचालन डॉ. मानसी बाहेती यांनी केले. डॉ. प्रवीण यण्णावार यांनी आभार मानले. डॉ. सिमा कोटेकर, डॉ. रमेश मंझा, डॉ. एस. बी. कुलकर्णी, रुपाली सुरासे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. सुर्य दुर्भा, प्रा. गुलाब सिंग, प्रा. एम. पी. पुनिया, प्रा. शमिता कुमार हे मार्गदर्शन करणार आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News