सामान्यांना मंत्रालयात प्रवेश बंदी; महाविकास आघाडीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 March 2020

मंत्रालयात सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकराने घेतला, त्यामुळे सामान्य नागरिकांना यापुढे मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही

मुंबई: कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव टाकळण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार धडसी निर्णय घेत आहे. मंत्रालयात सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकराने घेतला, त्यामुळे सामान्य नागरिकांना यापुढे मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी प्रसार माध्यमांना दिली.    

कोरोना आजारावर मात करण्यासाठी सरकारने महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच राज्यातील निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याची विनंती निवडणुक आयोगाला केली आहे असे टोपे यांनी सांगितले. 

देशभरात कोरोना व्हायसरने खुमाकुळ घातला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे काही पॉझीटीवर रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनग्रस्त रुग्णांची सख्या वाढतचं चाचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शाळा, महाविद्यालय, जीम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तसेच गर्दी टाळण्यासाठी जमाबंदीचा आदेश लागू केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News