GATE परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरु होणार अर्ज प्रक्रीया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020
  • यंदा गेट परीक्षेच्या पात्रतेत विद्यार्थ्यांना सुट देण्यात आली. अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेट परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

नवी दिल्ली : अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा गेट २०२१ पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यासाठी परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. १४ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर सात ऑक्टोंबर पर्यंत विलंब शुल्क भरुन अर्ज सबमीट करता येईल. अर्जात काही दुरुस्ती करण्यासाठी १३ नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आला आहे. ८ जानेवारी २०२१ रोजी गेट परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध होतील. गेट परीक्षा ५ फेब्रुवारी २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२१ यादरम्यान आयोजित केली जाईल. २०२१ करिता घेतली जाणारी गेट परीक्षा दोन सत्रात संपन्न होईल. सकाळी नऊ ते दुपारी बारा पहिले सत्र आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा दुसरे सत्र घेतले जाणार आहे. 

गेट परीक्षेत महत्त्वपुर्ण बदल

यंदा गेट परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. गेट परीक्षेत यंदा दोन विषय समाविष्ट करण्यात येणार आहे. पर्यावरण विज्ञान अभियांत्रिकी आणि मानवी समाजशास्त्र हे विषय समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्याांना नवीन विषयाचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

गेट परीक्षेची पात्रता 

यंदा गेट परीक्षेच्या पात्रतेत विद्यार्थ्यांना सुट देण्यात आली. अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेट परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. पूर्वी गेटसाठी दहावी, बारावी आणि चार वर्षाची पदवी पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येत होता मात्र, यंदा दहावी बारावी आणि अभियांत्रिकी पदवीचे तीन वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेटसाठी अर्ज करता येणार आहे. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना गेट परीक्षा देता येईल आहे. यामुळे करीयरची मोठी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News