गश्‍मीर-पूजा पहिल्यांदाच दिसणार एकत्र  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 January 2020
  • ‘बोनस’ या चित्रपटासाठी ही ग्लॅमरस जोडी सज्ज झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

आपल्या अनेक चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकणारा गश्मीर आणि पूजा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. अभिनेता गश्‍मीर महाजनीने ‘देऊळ बंद’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘कान्हा’सारख्या बऱ्याच मराठी चित्रपटात अगदी कमी काळात आपली ओळख निर्माण केली.

त्याचबरोबर अभिनेत्री पूजा सावंत म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा. पूजाने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

‘बोनस’ या चित्रपटासाठी ही ग्लॅमरस जोडी सज्ज झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. त्यात दोघेही रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News