गणेशोत्सव 'ही कसली ईश्वर भक्ती?'

शंभुराज पाटील
Friday, 6 September 2019

येता गणपती घरी 
झाले घराचे देऊळ 
झाले सूर
आरतीचे मंजुळ 

आला गणराया घरोघरी 
सडा-रांगोळी सजली दारोदारी
मखर फुलांची आरास
धूप रांगोळीचा मंद सुवास
गणरायाला आवडी मोदक 
वाहन त्याचे मूषक 
चौसष्ट कलांचा अधिपती 
असे, आमचा लाडका गणपती

येता गणपती घरी 
झाले घराचे देऊळ 
झाले सूर
आरतीचे मंजुळ 
भक्तिमय झाले भक्तगण 
हरपले देहभान 
आला गणराया घरोघरी 
आनंद दाटला अंतरी ।१।।

सार्वजनिक मंडळांची सजली मांदियाळी
ढोंगी भक्तीची दिसे बाजू काळी 
गणपती देखाव्यांची स्पर्धा
नाच-गाण्यात दिवस जाई अर्धा
गणपतीची पाठही नसे आरती 
ही कसली ईश्वर भक्ती?
पर्यावरण रक्षणाची 
करूया नवी युक्ती 
 संकल्पना राबवूया
एक गाव एक गणपती ।।२।।

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News