स्वतःच्याच गाण्यावर गणेश आचार्य धरणार ताल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

आता लवकरच ते एका नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यने आजवर बऱ्याच हिंदी चित्रपटांतील हिट गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. ‘चिकनी चमेली’, ‘मल्हारी’, ‘खली बली’ अशी बरीच गाजलेली गाणी त्यांनी दिग्दर्शित केली आहेत.

आता लवकरच ते एका नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दिग्दर्शक मनोज शर्मा यांच्या ‘खली बली’ या चित्रपटातील टायटल ट्रॅकमधून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत. विशेष म्हणजे या गाण्यात गणेश स्वतः नृत्य करताना दिसणार आहे. गणेश यांना या गाण्यात नृत्य करताना पाहणं रंजक ठरणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News