गड मानुसकीचा

सुमन लोकसेवा
Friday, 13 September 2019
  • गड मानुसकीचा ज्यात निराधार गरीब गरजु वृद्धांचा मोफत सांभाळ केला जातो.

पोळेगाव : मित्रांनो आपण गडकिल्ले तर खुप पाहिले असतील आणि भविष्यातही खुप पहाच कारण त्याशिवाय आपण कोण व काय करु शकतो व आपला इतिहास काय हे कळनार नाही... पण आज मी एका अशा गडाची माहीती आपणास देणार आहे की जो आजच्या युगात सर्व तरुणांना एक प्रेरणा देईल... गड मानुसकीचा ज्यात निराधार गरीब गरजु वृद्धांचा मोफत सांभाळ केला जातो.

ह्याच वैशिष्ट्य म्हणजे हा अतिशय सामान्य कुटुंबातुन प्रगतिशील होत. अतिशय निस्वार्थपणे स्वखर्चातुन उभा केला आहे एका अवलियाने ज्यांचे नाव आहे डॉ.ज्ञानेश्वर मुंडलिक जिथे आजच्या युगात लोक कोण कोणाला विचारत नाहीत तिथे शिवरायांचा आदर्श ठेवत ध्येयवादी बनत देणगी न घेता प्रामाणिक पणे रात्रंदिवस कष्ट करुन उभा केलेला हा किल्ला मनात घर करुन जातो.

अनाथांचा श्रावण बाळ होणारा हा मानुसकीचा गड सिंहगड पासुन पुढे पानशेत धरणाच्या पाणसाठ्यालगत अतिशय निसर्ग रम्य अशा पोळे या गावी आहे. व वाट पाहतोय निराधार गरीब गरजु वृद्धांची कारण लोकांना अजुन याची अधिक माहिती नाही व कुठलाच आर्थिक फायदा नसल्यामुळे कुठली मेडीया हे जगाला दाखवु शकत नाही. सोशल मेडीयातील गडप्रेमीं हे जास्तीत जास्त गरजुंपर्यंत पोहचवण्याचे कार्य करु शकतात. चला तर एक भेट देऊ या... मानुकसकीच्या गडाला.

पोळेगाव, ता.वेल्हे, जि.पुणे मोफत वृद्धाश्रम-9403405757
टिप- देणगी स्विकारली जात नाही. आपल्या शुभेच्छा व आशिर्वाद हिच आमची ताकत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News