भविष्यात तिसरे महायुद्ध 'या' कारणासाठी होईल!

मदन साबळे
Wednesday, 5 June 2019

नमस्कार, मित्रहो मी माझ्या लेखणीतून अनेक वेळा माझ्या मनात असणार्‍या व्यथा मांडत असतो. समाजामध्ये सध्यस्थिती आणि परिस्थिती खूप विचित्र झालेली पहायला मिळते. खरे तर हे सर्व करण्यास आणि होण्यास आपणच जबाबदार नाही आहोत का? ज्या काळामध्ये आपण इतके आधुनिक झालो आहोत, की त्याचा वेग आणि त्याची मर्यादा आपण विसरुन गेलो. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. मर्यादा असणे हे अत्यंत गरजेचे असते. 

नमस्कार, मित्रहो मी माझ्या लेखणीतून अनेक वेळा माझ्या मनात असणार्‍या व्यथा मांडत असतो. समाजामध्ये सध्यस्थिती आणि परिस्थिती खूप विचित्र झालेली पहायला मिळते. खरे तर हे सर्व करण्यास आणि होण्यास आपणच जबाबदार नाही आहोत का? ज्या काळामध्ये आपण इतके आधुनिक झालो आहोत, की त्याचा वेग आणि त्याची मर्यादा आपण विसरुन गेलो. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात.

मर्यादा असणे हे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे आपणास अतिशय वेगाने विकसित होणार्‍या देशांमध्ये दिसून येते की, शहरे कारखाने बाजारपेठा शाळा-कॉलेजेस सर्व काही आपल्या दैनंदिन जीवनावश्यक बाबींचा वापर, उपयोग वाढलेला असतो. सध्याची पर्यावरणाची दुरवस्था पाहता भविष्यात तिसरे महायुद्ध हे पर्यावरण वाचविण्यासाठी तर होणार नाही ना? असाही मिश्किल प्रश्न सध्या आपल्याला पडतो आहे. म्हणून म्हणतोय पर्यावरणाचा र्‍हास थांबवूया, भविष्यकाळ सुरक्षीत करुया!

आपली शहरे, गावे, हे सर्व विकसीत करत असताना मंदिरे, मस्जिदी उभारल्या. मात्र यामध्ये एक गोष्ट आपण पूर्णपणे विसरलो. ती म्हणजे निसर्ग जपणे. कसे ते लक्षात आले नाही की आपले इतर आजूबाजूचे देश पाहताना टीव्हीवर, वर्तमान पत्रामध्ये आता सोशल मीडिया यांमाध्यमातून आपण संस्कृत देश, त्यांच्याकडे असणारा काटेकोरपणा, स्वच्छता, पर्यावरण हे जोपासण्याचा सद्गुण, शिस्त चांगल्या प्रकारची आहे. म्हणून ते देश राजकारणाला जास्त महत्त्व न देता आपला भविष्यकाळ कसा उज्ज्वल होईल, याकडे जास्त लक्ष देताना पहायला मिळते आहे. कारण त्यांना एव्हाना समजलेले आहे. की, जर आपल्याला आपला भविष्यकाळ टिकून ठेवायचा असेल तर राजकारणाला बाजूला ठेवून इतर देशाप्रमाणे आपली वृत्ती ही शिस्तप्रिय आणि पर्यावरणस्नेही बनवायला हवी. 

मला एक प्रश्न नेहमी पडत असतो. सर्वकाही हा दिखावा असल्यासारखे वाटते की आपण जे करतो ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? आपण चांगले करण्यासाठी किती तरी वाईट करत असतो. म्हणजे कितीतरीपटीने जाणते अजानतेपणे वाईट किंवा चुका करतो आहोत, हे लक्षात कसे येत नाही? भविष्यकाळ टिकवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण येणार्‍या काळामध्ये तर मोठी कुठले लढाई म्हटले जाईल तर ती म्हणजे निसर्ग जपणे.

मला तर वाटते की तिसरे महायुद्ध हे निसर्ग जोपासण्यासाठीच होईल कदाचित. आपण आपल्या बाजूला असणार्‍या समाजामध्ये तरुण वर्गाला काय शिकवले जाते. हे तुम्हाला आणि मला चांगलेच माहीत आहे. तरुणांनी जर देशाच्या भवितव्याला दिशा दिली तर योग्यरित्या आपला भारत देश हा नक्कीच महासत्ता बनेल. तसेच आपण सर्वजण सुखसमृद्धीने जीवनाकडे वाटचाल करुन आपल्या देशाचे स्थान अव्वल क्रमांकावर नेऊ शकू. किती

घाण आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. माणूस फक्त स्वतःचे अस्तित्व चांगले ठेवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी भरपूर काम करतो. मात्र ते टिकवण्यासाठी काहीच का कसे करत नाही? इकडे भरपूर आजार बळावले जातात. कॅन्सर असो अनेक प्रकारचे कर्करोग असले दुर्धर आजार आपल्याला आजूबाजूला समाजामध्ये दिसून येतात. आपल्याला हे कसे लक्षात येत नाही की असे आजार पूर्वीच्या काळामध्ये नव्हते. औषधाने पण न बरे होणारे आहेत तरी आपण या असल्या राहणीमानात आपण जीवन जगतोय. आपल्या गलिच्छपणामुळे दुसर्‍यालाही तसेच जगायला लावतो आहे. खरेतर या सर्व चित्र

विचित्र गोष्टी आहेत. परंतु, आपण आपल्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यात, देशात हे असले नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे जटील प्रश्न पाहतो मात्र यामागचे कारण कधी शोधतो का? किंवा कोणाच्या लक्षात आले आहे का? कचरा, अस्वच्छता निष्काळजीपणा कचर्‍याची विल्हेवाट न लावणे मोठ्या मोठ्या कारखान्यांचे दूषीत पाणी थेट नदीला सोडणे अजिबात कुठल्याही प्रकारची शिस्त आपल्या देशांमध्ये दिसून येत नाही.

काटेकोरपणाची अंमलबजावणी ही फक्त कागदावर आणि दिखाव्यापुरती. पेपरवर दिसून येते. काटेकोरपणा आपल्याकडे नाही म्हणून ठराविक ठिकाणी सोडले तर अनेक ठिकाणी कचरा व्यवस्थापन न झाल्यामुळे आजार बळावतो. त्यामुळे अनेक भयानक रोग माणसाना व प्राण्यांना होतात. त्यामध्ये निष्पाप प्राणीसुद्धा हकनाक दगावतात. खरेच कसा आहे आपला देश आणि आपण तो कसा केला आहे? लोकसंख्या भरपूर असल्यामुळे या सर्व बाबींवर नियंत्रण आणणे शक्य नाही. परंतु, हे सर्व करण्याची आज गरज आहे. 

मला आठवते माझे लहानपण माझे अतिशय निसर्गरम्य वातावरणात गेले. त्याकाळी प्रत्येक प्रत्येक सकाळी प्रत्येक ऋतूमधली मज्जाच वेगळी होती. पण सध्या वर्तमानकाळा अतिशय हानिकारक जीवनशैली मध्ये आपण जगतोय. जुन्या विचारांची माणसे खरेच भविष्य काळ टिकून ठेवण्याचे मंत्र देत असत. आम्ही लहान असताना आमचे आजोबा सांगायचे की आरे, आमच्या या रानात या बांधावर असे आंब्याचे झाड लावले म्हणून आम्ही आमचे लहानपण मजेत आणि तंदुरुस्त घालवले परंतु, आता आंबा मिळतो तो बाजारात आताच्या मुलांना आंबा उतरवणे हे विचारले तर सांगता येणार नाही .

मला एवढेच सांगावेसे वाटते की, भविष्यकाळात टिकवून ठेवायचा असेल तर आपल्याला शिस्तप्रिय काटेकोरपणा जबाबदारी समाजामध्ये स्वच्छतेकडे पर्यावरणाकडे आणि या विकसित होणार्‍या विचारांकडे जर वाटचाल करत गेलो तर नक्कीच आपला देश हा जगातील स्वच्छ सुंदर असा समृद्ध देश बनू शकेल. एवढे मात्र नक्की!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News