या स्पर्धेवर आयपीएलचे भवितव्य अवलंबून 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020
  • विश्वकरंडक ट्‌वेन्टी-20 स्पर्धेबाबत तारीख पे तारीख

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्‌वेन्टी-20 स्पर्धेबाबत आयसीसी अजून तारीख पे तारीखचा खेळ करत निर्णय लांबवत असले, तरी त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. मेलबर्नची राजधानी आणि व्हिटोरी प्रातांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. परिणामी फुटबॉल लीग, ए लीग आणि राष्ट्रीय रग्बी लीग पुढे ढकलण्यात आली आहेत.

ऑस्ट्रेलियातील या विश्वकरंडक स्पर्धेवर क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ ही स्पर्धा पुढे ढकलावी, यासाठी आग्रही आहे; परंतु त्यांचे पंतप्रधान स्पर्धा नियोजित वेळेत घेण्यासाठी ठाम आहेत. इतकेच नव्हे, तर 15 टक्के प्रेक्षकांच्याही उपस्थितीतही खात्री व्यक्त केली होती. त्यामुळे आयसीसीही अंतिम निर्णय लांबवत आहे.

या विश्वकरंडक स्पर्धेच्या भवितव्यावर भारतातील आयपीएलच्या आशा अवलंबून आहेत. विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलली तर तो कालावधी आयपीएलसाठी मिळावा, यासाठी बीसीसीआय आशावादी आहे. पण आता व्हिक्‍टोरी आणि मेलबर्न येथे रुग्ण वाढल्याने आयसीसी तसेच ऑस्ट्रेलिया सरकारला फेरविचार करावा लागण्याची शक्‍यता आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मेलबर्नच्या एमसीजी स्टेडियमवर अंतिम सामन्यासह वर्ल्डकपचे सात सामने होणार आहेत; परंतु आता कोरोनाचे रुग्ण वाढल्याने स्थानिक प्रशासन आंतरराष्ट्रीय हालचालींवर निर्बंध कडक करणार आहे.

चेंडू आयसीसीच्या कोर्टात

दोन महिन्यांपासून आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत निर्णय लांबवत आहे. त्यामुळे बीसीसीआयने उघड नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर आयसीसी आणि बीसीसीआयच्या सामन्यांचे ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्टसनेही आयसीसीसह बीसीसीआयला पत्र लिहून लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता चेंडू आयसीसीच्या कोर्टात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News