'परंपरा पुढे चालू ठेवली', पाकिस्तानी फलंदाजांचा रन आउट पुन्हा फेमस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 February 2020

 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने तिकिट निश्चित केले आहे. अंतिम सामना 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

वर्ष 2020. फेब्रुवारी महिन्याचा चौथा दिवस. 19 वर्षांखालील विश्वचषकातील एक हाय व्होल्टेज सामना खेळवला गेला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपची उपांत्य फेरी होती. हा सामना भारतानं एकतर्फी जिंकला.

173 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने कोणतीही गडी न गमावता दिले. यशस्वि जयस्वाल आणि दिव्यंश सक्सेना या जोडीने नाबाद 176 धावांची भागीदारी केली.  19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने तिकिट निश्चित केले आहे. अंतिम सामना 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
 

पूर्ण टूर्नामेंट मध्ये  टीमच्या प्रयत्नाने भारताचा संघ पुढे सरसावत आहे. पाकिस्तानी संघात फारच कमी सामंजस्य पाहायला मिळाले.  सेमीफायनल सामन्याच्या पहिल्या डावात  पाकिस्तानच्या फलंदाजांमध्ये समन्वयाचा स्पष्ट अभाव दिसला. जिथे धावण्याची संधी नव्हती तेथे धाव चोरण्याच्या प्रयत्नात केवळ विकेट गमावली नाही तर सोशल मीडियावर मीमसाठी बराच कच्चा मालही दिला.

 

 

पाकच्या डावातलं  31 वं षटक. फिरकीपटू रवी बिश्नोईच्या हातात चेंडू होता. पहिल्या दोन चेंडूत एकही रन नाही. तिसरा चेंडू कासिम अक्रमने पुढच्या बाजूला ढकलला. आणि एक धाव घेतली. कर्णधार रोहेल नाझीर नॉन-स्ट्रायकर कडे नजर होती. रोहेल धावबाद होऊ लागला. पण बॉल अथर्वच्या हातात दिसताच रोहेल नॉन-स्ट्रायकरकडे परत धावला. मैदानावर विचित्र दृश्य दिसत होते. दोन्ही फलंदाज एकाच टोकाला धावत होते. अथर्वचा चेंडू यष्टीरक्षक ध्रुव जुरेलला कडे. आणि धृवने न डगमगता त्रीफळा उडवला.

सोशल मीडियावर खिल्ली
सोशल मीडियावर जनता अशा प्रसंगांच्या शोधात बसलेली असते. त्यांनीही मजा करायला सुरुवात केली. आम्ही तुमच्यासाठी काही ट्विटस घेऊन आलो आहोत. पहा

एका युसरने लिहिले,
जर धावणे ही एक कला असेल तर पाकिस्तान हा त्याचा पिकासो आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News